शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत वेश्या अड्डा उद्धवस्त, एलसीबीची कारवाई, सहाजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:29 IST

विजयनगर येथील योगीराज बंगल्यात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून अल्पवयीन पिडीत मुलीसह एका महिलेची सुटका केली. याप्रकरणी मुली पुरविणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविजयनगरमधील बंगल्यावर छापाअनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाची कारवाईअल्पवयीन पिडीत मुलीसह एका महिलेची सुटका

सांगली : विजयनगर येथील योगीराज बंगल्यात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून अल्पवयीन पिडीत मुलीसह एका महिलेची सुटका केली. याप्रकरणी मुली पुरविणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यामध्ये पुजा उर्फ सविता मनोज बोईन (वय ४०, रा. योगीराज बंगला, श्रीरामनगर, विजयनगर), एजंट रिक्षाचालक सुनील यशवंत पुकळे (वय ३०, रा. सुतगिरणी, कुपवाड), उमेश रवी कांबळे (२१, रा. महात्मा फुले सोसायटी सुतगिरणीजवळ कुपवाड), विशाल संजय सावंत (१९, रा. भारत सुतगिरणी चौक), नारायण धोंडीराम कुंभार (३१) व अभिजित रघुनाथ कुंभार (३०, दोघेही रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस अधिक्षक सुहेर शर्मा, अप्पर अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधसंदर्भात जिल्ह्यात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने यांना दिले होते. एलसीबीकडील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला विजयनगरमधील योगीराज बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

कक्षाकडील उपनिरीक्षक शिल्पा यमगेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने योगीराज बंगल्यावर छापा टाकला. या छाप्यात मुली पुरविणाऱ्या पुजा बोईन, एजंट सुनील पुकळे याच्यासह चार ग्राहक ताब्यात घेतले. या अड्ड्यावरील एक अल्पवयीन मुलगी व पिडीत महिलेची पोलिसांनी सुटका केली.

या सहाजणाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा व बाल लैगिंक अत्याचार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाई सहाय्यक पोलिस फौजदार भगवान नाडगे, हवालदार विकास पाटणकर, लता गावडे, कविता पाटील यांनी भाग घेतला.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस