सांगलीत मारामारी; चौघेजण जखमी
By Admin | Updated: September 29, 2014 00:28 IST2014-09-29T00:25:49+5:302014-09-29T00:28:41+5:30
शहर पोलिसांत गुन्हा दाखल

सांगलीत मारामारी; चौघेजण जखमी
सांगली : येथील गावभागात दोन गटात जोरदार मारामारी झाली. यामध्ये चौघे जखमी झाले आहेत. आज (रविवार) सायंकाळी ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
अखिलेश माने (वय २९), अनिता तानाजी जाधव (२७), कैलास गयाराम जाधव (२३) व दत्ता सखाराम जाधव (३५, सर्व रा. गावभाग, सांगली) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मारामारीत दगड, विटा, काठ्या व लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. गल्लीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनेनंतर शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी जखमी गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना प्रथमोपचारासाठी पाठविले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. यामुळे मारामारीचा तपशील समजू शकला नाही. याबाबत शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्यांनी मारामारीची घटना घडली आहे. यामध्ये चौघे जखमी झाले आहेत. त्यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)