शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

सांगलीत ‘चेनस्नॅचर’ टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:54 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करणाºया ‘चेनस्नॅचर’ टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले होते. टोळीतील चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शिराळा, कोकरूड व पलूस पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दहा गुन्हे उघडकीस आले असून, २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करणाºया ‘चेनस्नॅचर’ टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले होते. टोळीतील चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शिराळा, कोकरूड व पलूस पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दहा गुन्हे उघडकीस आले असून, २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.अटक केलेल्यांमध्ये माणिक ऊर्फ राघव वसंत लखे (वय ३५, रा. कासेगाव), सुनील सुखदेव काटकर (२७, काळमवाडी), नितीन जगन्नाथ यादव (वाटेगाववाडी, ता. वाळवा) व अनिल सिद्धाप्पा कोनीन-तलवार (३३, शिंदे मळा, संजयनगर, सांगली) यांचा समावेश आहे.गेल्या काही महिन्यांपासून सांगली तसेच शिराळा, कोकरुड व पलूस परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने लंपास करणाºया टोळीने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलीसप्रमुख शिंदे यांनी या टोळीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग टोळीच्या मागावर होता. या टोळीचे धागेदोरे हाती लागताच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी २०१२ पासून शिराळा, कोकरूड व पलूस हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. आतापर्यंत त्यांनी दहा गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील मंगळसूत्र, गंठण, बोरमाळ, सर असे २० तोळे सोन्याचे दागिने व दोन दुचाकी असा सात लाखांचा माल जप्त केला आहे. चौघांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. आई-वडील शेतात मजुरीसाठी जातात. चौघांनी शिक्षणही पूर्ण केलेले नाही. ते दारूच्या आहारी गेले आहेत.पोलीस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, सहायक फौजदार विजयकुमार पुजारी, हवालदार सागर पाटील, शशिकांत जाधव, जगन्नाथ पवार, संजय पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी अतिरिक्तजिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे उपस्थित होते.आणखी एक टोळी गजाआडगेल्या आठवड्यात अटक केलेल्या विश्वजित ऊर्फ रौनक खेराडकर (वय २१), रोहित ऊर्फ अभिजित चव्हाण (२०), प्रफुल्ल व्होवाळे (१९, रा. तासगाव), अनिल बाबर (३०, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) या ‘चेनस्नॅचर’ टोळीकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.