शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेच्या कोट्यवधीच्या मालमत्ता बेवारस, जिओ टॅगिंग करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:06 IST

विकसित केल्यास तिजोरीत भर

सांगली : जिल्हा परिषदेच्या कोट्यवधींच्या मालमत्ता जिल्हाभरात वापराविना पडून आहेत. आता त्यांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असून, मालमत्ता निश्चित केल्या जाणार आहेत.जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या या जागा गावोगावी आहेत. पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा आदी सर्वच विभागांच्या या जागा सध्या वापराविना आहेत. काही शाळांच्या जुन्या इमारती पडल्यानंतर नव्या उभारल्या गेल्या. जुनी जागा मात्र तशीच पडून आहे. तेथे क्रीडांगण, बगिचा असे उपक्रम झाले नाहीत.

वर्षानुवर्षे बेवारस स्थितीत पडून राहण्याने त्यावर हळूहळू अतिक्रमणे होऊ लागली आहेत. शेजारच्या रहिवाशांकडून जागा बळकावल्या जात आहेत. गेल्या अनेक वर्षांत या जागा विकसित करण्यात आलेल्या नाहीत. या जागांचा गैरवापर होऊ लागल्याने २०१७ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे सर्वेक्षण केले होते. रीतसर नोंदी केल्या होत्या. आता पुन्हा त्यांचा शोध घेऊन सद्य:स्थिती तपासली जाणार आहे. त्यासाठी जिओ टॅगिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.या मालमत्तांमधून तूर्त जिल्हा परिषदेला फारसे उत्पन्न मिळत नाही. शिवाय उत्पन्नाचे विविध स्त्रोतही अत्यंत मर्यादित आहेत. या स्थितीत या मालमत्ता विकसित केल्यास जिल्हा परिषदेला स्वत:चा निधी उभारता येणे शक्य आहे. विशेषत: मिरजेत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जागेत व्यापारी कॉम्प्लेक्स उभारल्यास तिजोरीत भर पडणार आहे. एखादे प्रशिक्षण केंद्र, सभागृह उभारल्यास प्रशासनालाही त्याचा फायदा होणार आहे.

मिरजेत मध्यवर्ती जागामिरजेत शहर पोलिस ठाण्याच्या पिछाडीला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची कोट्यवधी रुपये किमतीची जागा वर्षानुवर्षे पडून आहे. त्यावर अतिक्रमणेही होत आहेत; पण ही जागा विकसित करण्याची किंवा तेथे एखादे कार्यालय उभारण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेने केलेली नाही.

जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे स्वतंत्र रजिस्टर आमच्याकडे आहे. त्यात मालमत्तांच्या नोंदीही आहेत. या सर्व मालमत्तांचे जिओ टॅगिंग केले जाणार असून, त्यांची सध्याची स्थिती पाहिली जाणार आहे. -तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद