शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

मार्च एण्डला सांगली जिल्हा परिषदेला मिळाला १०९ कोटींचा निधी, प्रशासनाची रात्रभर धावपळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:07 IST

वित्त आयोगातून मिळणारा निधी मिळालाच नाही

सांगली : वर्षभरापासून शासनाकडे थांबून राहिलेला निधी मार्च एण्डच्या घाईगडबडीत अखेरच्या दोन दिवसांत चक्क जिल्हा परिषदेला १०९ कोटी रुपयांचा निधी मिळाला. यामध्ये पूरग्रस्त भागातील रस्ते व पूल, शिक्षण, आरोग्य, शाळा आणि ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातील निधींचा समावेश आहे. शासनाकडून मिळालेल्या उशिराचा निधी खर्च करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांची रात्रभर धावपळ चालू होती.जिल्हा परिषदकडे प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात शेवटच्या क्षणी बराच निधी येतो. शेवटच्या क्षणी जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्हा परिषदेला कसा मिळेल यासाठी मंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असतो. या वर्षी जिल्हा परिषद पदाधिकारी नसतांनाही मार्च एण्डला विक्रमी निधी मिळाला आहे. यामध्ये पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीसाठी २३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पूरग्रस्त भागातील रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले होते. पण, निधी नसल्यामुळे कामे प्रलंबित होती. अखेर शासनाने मिरज, शिराळा, वाळवा आणि पलूस तालुक्यांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शासनाच्या ५०-५४ या हेडखाली रस्ते कामासाठी नऊ कोटी रुपये जिल्हा परिषदेस मिळाले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य केंद्रांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी २६ कोटी रुपये निधी असून मॉडेल स्कूलसाठीही चांगला निधी मिळाला आहे. अखेरच्या दिवशी निधी मिळूनही तो खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत धावपळ चालू होती.

असा मिळाला निधी

  • ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून २३ कोटी
  • पूरग्रस्त भागातील रस्ते, पूल दुरुस्तीसाठी १६ कोटी
  • शाळांमध्ये रोबोटिक साहित्य खरेदीसाठी ४ काेटी
  • जिल्हा परिषद आरोग्य केंद्राच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी २६ कोटी
  • नवीन शाळा खोल्या व दुरुस्तीसाठी २१ कोटी
  • जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी ९ कोटी
  • मनरेगामधून अबंधितसाठी १० कोटी

वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला निधी नाहीचजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक नियुक्त आहे. यामुळे सदस्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी वित्त आयोगातून मिळणारा निधी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना मिळालाच नाही. केवळ ग्रामपंचायतीसाठीच २३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना निधी न मिळाल्यामुळे अनेक विकास कामांना अडथळा बसणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद