शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांचा लेखणी बंद आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 12:20 IST

पदभरती, पदोन्नती तातडीने करण्याची मागणी

सांगली : जिल्हा परिषद अभियंत्यांच्या पदोन्नती व विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यस्तरीय लेखणी बंद आंदोलनाचा इशारा अभियंता संघटनेने दिला. सांगलीत रविवारी संघटनेची राज्यस्तरीय त्रैमासिक बैठक झाली. यासाठी विविध जिल्ह्यांतून अभियंते उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे, जलसंधारणचे कार्यकारी अभियंता संतोष कुंभार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले आदी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात केंद्रीय कार्यकारिणीची खुली बैठक झाली. अभियंता संघटनेच्या मागण्यांवर सर्वसमावेशक चर्चा झाली. दुपारच्या सत्रात राज्य कार्यकारिणीची खुली बैठक झाली.

संघटनेचे राज्याध्यक्ष सुहास धारासूरकर यांनी अभियंत्यांच्या विविध समस्या मांडल्या. ते म्हणाले, जिल्हा परिषद अभियंत्यांवर कामाचा अतोनात ताण निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतांनुसार एका शाखा अभियंत्याने वर्षभरात ५६ लाखांची कामे करणे अपेक्षित आहे, पण सध्या त्याला कोणतीही मर्यादा राहिलेली नाही. जलजीवन मिशनसारख्या योजनांमुळे कोट्यवधी रुपयांची कामे करावी लागत आहेत. त्याशिवाय योजनेविषयी तक्रारी, त्यांची चौकशी आदी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अभियंत्यांच्या रिक्त जागा भरण्याविषयी शासन कार्यवाही करत नाही. त्यामुळेही अभियंते दबावाखाली आहेत. बैठकीला गणेश शिंगणे, सचिन चव्हाण, युवराज बाबर, किशन साळुंखे, संदेश बोतालजी, व्ही. बी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

बैठकीत झालेले ठरावबैठकीत विविध ठराव झाले. त्यानुसार अभियंत्यांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांसोबतही बैठक घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यानंतरही मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा संघटनेने दिला. महिन्याभरानंतर टप्प्याटप्प्याने लेखणी बंद व अन्य आंदोलने केली जाणार आहेत.

अभियंत्यांच्या मागण्या अशा- रिक्त जागा त्वरित भराव्यात.- पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने राबवावी.- अभियंत्यांवरील कामांचा ताण कमी करावा.- आकृतिबंधानुसार कर्मचारी भरती केली जावी.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद