शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोथळे प्रकरणानंतर आणखी एक प्रताप, पोलीस ठाण्यात सख्ख्या भावांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 05:40 IST

कौटूंबिक वादातून झाडलेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या गणेश दशरथ गंभीरे ( वय २२, रा. रामकृष्ण नगर कुपवाड) या तरुणास कुपवाड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत शिंदे यांच्यासह चौघांनी काठीने बेदम मारहाण केली

ठळक मुद्देपोलीस ठाण्यातच तरुणास बेदम मारहाण. कुपवाडमधील घटना  अनिकेत कोथळेनंतर सांगली पोलिसांचा आणखी एक प्रताप

सांगली : कौटूंबिक वादातून झाडलेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या गणेश दशरथ गंभीरे ( वय २२, रा. रामकृष्ण नगर कुपवाड) या तरुणास कुपवाड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत शिंदे यांच्यासह चौघांनी काठीने बेदम मारहाण केली. बुधवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला आहे.|अनिकेत कोथळेचा मारहाण करुन खून केल्याच्या घटनेला अजून सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला नाही, तोपर्यंत सांगली पोलीस दलाचा आणखी एक कारनामा कुपवाड पोलिसांच्या कृतीमुळे उजेडात आला आहे. मारहाणीत गणेश गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाचे हाड मोडले आहे. शरिरावरही मारहाणीचे व्रण उठले आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विश्रामबागचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी गुरुवारी दुपारी जखमी गणेशचा जबाब नोंदवून घेतला. यामध्ये त्याने कशाप्रकारे माहारण केली, याचा उलगडा केला आहे. याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक शिंदेसह चार पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी गणेशच्या नातेवाईकांनी केली आहे.गणेशचे कौटूंबिक वादातून भावाशी भांडण झाले होते. यातून त्यांच्यात मारामारीही झाली होती. याप्रकरणी गणेश कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेला होता. सहाय्यक निरीक्षक शिंदे यांची त्याने भेट घेतली. पण शिंदे यांनी त्याची तक्रार नोंदवून घेण्याचा आदेश दिला नाही.

गणेशला मंगळवारी दिवस आणि रात्रथर पोलीस ठाण्यात बसवून घेतले. गणेशने याचा जाब विचारल्यानंतर शिंदेसह चार पोलिसांनी त्याला बुधवारी पहाटे तीन वाजता काठीने बेदम मारहाण केली. सकाळी त्याला घरी जाण्यास सांगितले.

घरी गेल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर घरच्यांनी त्याला उपचारासाठी हलविले. दरम्यान सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, आसिफ बावा, महेश खराडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करु असा इशारा दिला आहे.

दादागिरी कायमअनिकेत कोथळे प्रकरणानंतर पोलीस दलास धक्का बसला. तेंव्हापासून गुन्हे प्रगटीकरणाचे काम संथगतीने सुरु राहिले. गुन्हेगारीच प्रचंड वाढ झाली. लुटमार व घरफोडीच्या गुन्ह्यांचा मालिकाच सुरु राहिली. गेल्या महिन्याभरात दहा खून झाले. वाढत्या गुन्हेगारीला वर्दीचा धाक दाखविण्याऐवजी गणेश गंभीरेला केलेली मारहाण म्हणजे पोलिसांची दादागिरी अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणSangliसांगलीPoliceपोलिस