शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

बहिणीच्या लग्नासाठी गावी येत असतानाच काळाचा घाला, भावाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 16:45 IST

बहिणीच्या लग्नासाठी अक्षय गावी येणार हाेता. गावातीलच मदुराईस्थित गलाई व्यावसायिक धनाजी शिंदे-पाटील हेही गावाकडे येण्यासाठी निघाले होते. त्यांच्याच माेटारीतून अक्षयही गावी येण्यास निघाला असता ही दुर्घटना घडली.

लेंगरे : बहिणीच्या लग्नासाठी मदुराईहून गावाकडे येत असताना माेटार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात भावाचा मृत्यू झाला. अक्षय उत्तम शिंदे-पाटील (वय २१, रा. लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली), असे मृत युवकाचे नाव आहे. गलाई व्यवसायानिमित्ताने ताे मदुराई येथे राहात हाेता. ही घटना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकात चित्रदुर्गनजीक हरियूर येथे घडली. अपघातात माेटारीतील महिलेसह अन्य दाेघे जखमी झाले आहेत.

लेंगरे येथील उत्तम शिंदे यांचा मदुराईत गलाई आणि सराफ व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षांपासून मुलगा अक्षय हा व्यवसाय सांभाळत होता. अत्यंत कमी वयात यशस्वी व्यावसायिक म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती. लेंगरे परिसरातही युवकांचे संघटन केले होते.पुढच्या आठवड्यात उत्तम शिंदे यांच्या मुलीचा विवाह नियोजित होता. बहिणीच्या लग्नासाठी अक्षय लेंगरेला येणार हाेता. गावातीलच मदुराईस्थित गलाई व्यावसायिक धनाजी शिंदे-पाटील हेही गावाकडे येण्यासाठी निघाले होते. त्यांच्याच माेटारीतून (क्र. टीएन ५९ बीएच ५८१०) अक्षयही गावी येण्यास निघाला.

मंगळवार दि. ३ मे रोजी सायंकाळी धनाजी शिंदे-पाटील, त्यांची पत्नी छाया व अक्षय असे तिघेजण लेंगरेकडे येण्यासाठी मदुराई येथून निघाले. बुधवारी ४ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास कर्नाटकातील चित्रदुर्गनजीक पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हरियूर हद्दीत त्यांची माेटार समोरील ट्रकवर (क्र. टीएन ५२ एल ८४९) आदळली. अपघात इतका भीषण होता की माेटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. नागरिकांनी तातडीने सर्व जखमींना चित्रदुर्ग येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हलवीत असतानाच अक्षयचा मृत्यू झाला, तर धनाजी शिंदे यांच्यावर गुरुवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. छाया यांची प्रकृतीही गंभीर आहे.

नातेवाईकांची धावाधाव

दरम्यान, अपघाताची माहिती लेंगरे येथे समजताच नातेवाईकांनी चित्रदुर्ग, बंगळुरू येथील गलाई व्यावसायिकांशी संपर्क साधला. तेथून तातडीने गलाई व्यावसायिक घटनास्थळी दाखल झाले. लेंगरेतूनही तातडीने नातेवाईक चित्रदुर्गकडे रवाना झाले. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अक्षयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सकाळी लेंगरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात