शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

सांगली : राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे, राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:11 IST

तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा सांगली राष्ट्रवादी महिला आघाडीने बुधवारी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली.

ठळक मुद्देराम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडेवक्तव्याचा निषेध : राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन

सांगली : तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा सांगली राष्ट्रवादी महिला आघाडीने बुधवारी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली.सांगली जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयासमोर महिलांनी आंदोलन केले. यावेळी एक मोठा फलक महिलांनी तयार केला होता. त्यावर राम कदम यांची छायाचित्रे व वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला होता.

हा राम नावाचा रावण आहे, एक कदम रावण की और, तुम बेटिया बचाओ, हम उनको भगायेंगे अशा प्रकारची विडंबनात्मक वाक्ये लिहून राम कदम यांचा निषेध करण्यात आला.

महिला कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त केला. अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणाही महिलांनी दिल्या.यावेळी स्थायी समितीच्या माजी सभापती नगरसेविका संगीता हारगे म्हणाल्या की, गेल्या चार वर्षात महिलांवरील आत्याचारात वाढ झाली आहे. सरकारने महिलांना संरक्षण देण्याऐवजी त्यांचेच आमदार आता महिलांना पळवून नेण्याची भाषा वापरत आहेत.

राम कदम यांच्या या वक्तव्यामुळे तमाम महिलावर्ग व पालकवर्गात चिंतेचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारमधल्या व भाजपच्या एकाही नेत्याने या गोष्टीचा निषेधसुद्धा केला नाही. त्यांनी बाळगलेले मौन हे अशा आमदारांना पाठबळ देणारेच आहे. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा आता लोकांसमोर आला आहे.

महिला वर्गाबद्दल इतका वाईट विचार या सरकारमधले प्रतिनिधी करीत असतील तर महिलांनी दाद कुठे मागायची, असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

आंदोलनात शांता गायकवाड, सुरेखा मासाळ, आयशा शेख, छाया पाटील, अनिता पांगम, आशा पाटील, छाया मोरे, वैशाली करपे आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.निषेध करीत राहणार!राम कदम यांच्यासह सरकारने महिला वर्गाची तातडीने माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. सरकार माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही विविध मार्गाने सरकारच्या महिला विरोधी धोरणाचा निषेध करीत राहू, असा इशारा हारगे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Ram Kadamराम कदमNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगली