शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत प्रवासात महिलेचे दागिने लंपास, चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:21 IST

खिद्रापूर (जि. कोल्हापूर) येथील मालती नागेशराव कदम (वय ७४) या महिलेचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व साडेसात हजाराची रोकड असा दीड लाखाचा ऐवज, त्या सांगली-कुरुंदवाड एसटी प्रवासात चोरट्यांनी लंपास केला. बुधवारी दुपारी ही घटना घडली. एसटी प्रवासात दागिने लंपास होण्याची चार दिवसातील ही तिसरी घटना आहे. तीनही घटनांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांचे दागिने लंपास झाले आहेत.

ठळक मुद्देएसटी प्रवासात दागिने लंपास होण्याची चार दिवसातील तिसरी घटना तीनही घटनांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांचे दागिने लंपास सांगलीच्या बस स्थानकावरील पोलिस गायब

सांगली, दि. २७ : खिद्रापूर (जि. कोल्हापूर) येथील मालती नागेशराव कदम (वय ७४) या महिलेचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व साडेसात हजाराची रोकड असा दीड लाखाचा ऐवज, त्या सांगली-कुरुंदवाड एसटी प्रवासात असताना चोरट्यांनी लंपास केला.बुधवारी दुपारी ही घटना घडली. एसटी प्रवासात महिलांचे दागिने लंपास होण्याची चार दिवसातील ही तिसरी घटना आहे. तीनही घटनांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांचे दागिने लंपास झाले आहेत.

मालती कदम यांची मुलगी भिलवडी (ता. पलूस) येथे राहण्यास आहे. दिवाळीनिमित्त मुलीला फराळ देण्यासाठी त्या बुधवारी भिलवडीला गेल्या होत्या. तेथून त्या खिद्रापूरला जाण्यासाठी सांगली मुख्य बस स्थानकावर चार वाजता आल्या. सव्वाचार वाजता सांगली-कुरुंदवाड एसटी बस लागली होती. त्यांनी दागिने पर्समध्ये ठेवले व त्या बसमध्ये बसल्या.

बस आकाशवाणी केंद्राजवळ गेल्यानंतर तिकीट काढण्यासाठी त्यांनी पैसे असलेली पर्स उघडली. त्यावेळी पर्समध्ये दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हा प्रकार वाहकाला सांगितला. वाहकाने शहर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी बसमधील प्रवाशांकडे चौकशी केली. पण काहीच धागेदोरे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.सांगलीच्या बस स्थानकावरील पोलिस गायबसांगलीच्या बस स्थानकावर चोरट्याने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. स्थानकावरील पोलिस चौकी केवळ नावापुरतीच राहिली असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस