शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

राष्ट्रगीतासाठी स्तब्ध झाली सांगली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 1:01 PM

एकाचवेळी स्तब्ध राहून राष्ट्रगीत गायनाचा हा पहिलाच प्रसंग असल्याने नागरिक भारावून गेले.

अविनाश कोळी

सांगली : सामुदायिक राष्ट्रगीत गायनासाठी आज, बुधवारी सांगली स्तब्ध झाली. सार्वजनिक ठिकाणांसह रस्ते, चौक तसेच घरांमध्येही सांगलीकरांनी सकाळी ११ वाजता एकाचवेळी राष्ट्रगीत सादर करुन अनोखा विक्रम केला.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाच्यावतीने सामुदायिक राष्ट्रगीत गायनाबाबतची सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. नागरिकांनाही यासाठी आवाहन केले होते. सकाळी ११ वाजता सांगलीत भोंगा वाजल्यानंतर ठिकठिकाणी राष्ट्रगीत सुरु झाले. शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालये, क्रीडांगणे, रस्ते, चौक अशा सर्वठिकाणी राष्ट्रगीताचे गायन नागरिकांनी केले. काहींनी घरीच गायन केले. एकाचवेळी स्तब्ध राहून राष्ट्रगीत गायनाचा हा पहिलाच प्रसंग असल्याने नागरिक भारावून गेले. ठिकठिकाणी ध्वाजारोहण करुन राष्ट्रगीत गायन करण्यात आले.सांगलीतील अनेक रस्ते, बाजारपेठांत नेहमी वर्दळ असते. ११ वाजता राष्ट्रगीतावेळी वाहतूक तसेच बाजारपेठेतीही हालचालीही थांबल्या. शांततेत केवळ राष्ट्रगीताचा आवाज सर्वत्र येत असल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणाही देण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ध्वनीक्षेपकांचा वापरसांगलीच्या अनेक चौकांतील सिग्नल यंत्रणेजवळ ध्वनीक्षेपक बसविण्यात आले आहेत. त्यावरही राष्ट्रगीत लावण्यात आले. काहीठिकाणी पोलिसांच्या वाहनावरील ध्वनीक्षेपकांतून राष्ट्रगीत लावण्यात आले. नागरिकांनी सुरात सुर मिसळून राष्ट्रगीत गायन केले.

भाविकही गायनात दंग

मंदिरात देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही उपक्रमात सहभाग घेत राष्ट्रगीत सादर केले. सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिराबाहेर शेकडो नागरिकांनी एकत्र येत ध्वनीक्षेपकाशिवाय राष्ट्रगीत सादर केले.

टॅग्स :SangliसांगलीIndependence Dayस्वातंत्र्य दिन