शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीवर होते राजीव गांधी यांचे विशेष प्रेम--चार वेळा भेट

By admin | Updated: May 20, 2016 23:40 IST

दादा घराण्यातील तीन पिढ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते; दौरा रद्द झाल्याची --स्मृतिदिन विशेषखंतही होती--राजीव गांधी

अविनाश कोळी -- सांगली --वसंतदादांच्या माध्यमातून राजीव गांधी यांचे सांगलीशी नाते जुळले. दादा घराण्यातील तीन पिढ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते सर्वपरिचित झाले. याच प्रेमापोटी त्यांनी एकदा-दोनदा नव्हे, तर चारवेळा सांगलीला भेट दिली. याशिवाय एक दौरा रद्द झाल्याची खंतही त्यांच्या मनात दीर्घकाळ राहिली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशाचे नेतृत्व कोण करणार?, हा प्रश्न निर्माण झाला. वसंतदादा त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते. दादांनी दिल्लीत गेल्यानंतर काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली व पंतप्रधान पदाची सूत्रे राजीव गांधी यांना सोपविण्याची सूचना केली. राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांची भेट घेऊन त्यासंदर्भात त्यांना विनंती केली. राष्ट्रपतींनी त्याचदिवशी त्यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. वसंतदादांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या या प्रेमापोटी राजीव गांधी यांनीही त्यांच्या घराण्यास भरभरून प्रेम दिले. महाराष्ट्रातील विधानसभेच्या प्रचारासाठी राजीव गांधी दौरे करीत होते. त्यावेळी २0 फेब्रुवारी १९८४ रोजी त्यांची सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयासमोरील मोकळ्या मैदानावर सभा झाली होती. ही सभा खूप गाजली. सभेला झालेली गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून राजीव गांधी भारावून गेले होते. त्यानंतर सांगलीच्या शिवाजी स्टेडियमवर धनगर समाजाच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले होते. त्यावेळी शिवाजीराव शेंडगे पालकमंत्री होते. राजीव गांधी यांना घोंगडे भेट देऊन त्यांच्या गळ्यात ढोलही अडकविला होता. या सत्कारानेही ते भारावून गेले होते. वसंतदादांची प्रकृती ठीक नव्हती, त्यावेळी मुंबईत रुग्णालयामध्ये त्यांची विचारपूस करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी दादांच्या स्नुषा शैलजाभाभी पाटीलही उपस्थित होत्या. रुग्णालयाच्या खोलीत त्यावेळी तिघेच उपस्थित होते. वसंतदादांचे निधन झाल्यानंतर शासकीय ‘प्रोटोकॉल’ डावलून ते सांगलीत उपस्थित झाले होते. दादांच्या पश्चात त्यांनी प्रकाशबापू पाटील यांच्यावरही तितकेच प्रेम केले. प्रकाशबापू आणि त्यांचे नाते नागपुरात अधिक घट्ट झाले. पंतप्रधान होण्यापूर्वीची ही गोष्ट होती. त्यावेळी पक्षाच्या एका कार्यक्रमानिमित्त राजीव गांधी नागपुरात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये थोडा दंगा झाल्यानंतर तातडीने राजीव गांधी प्रकाशबापूंना घेऊन तिथून निघाले. नागपुरात त्यावेळी एकाच खोलीत प्रकाशबापू व ते राहिले होते. त्यानंतर प्रत्येकवेळी प्रकाशबापूंची ते आपुलकीने चौकशी करीत असत. दादांच्या पश्चात वसंतदादा कारखान्याच्या आवारात दादांचा पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण करण्याकरिताही राजीव गांधी शरद पवारांसोबत आले होते. कार्यक्रमानंतर ज्यावेळी कारखान्याच्या कार्यस्थळावर ते भोजनासाठी आले, त्यावेळी अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली. राजीव गांधी यांना अक्षरश: उचलून वाहनापर्यंत आणण्यात आले होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी प्रकाशबापूंना पुण्यापर्यंत येण्याची विनंती केली. मात्र बापूंना त्रास होईल म्हणून त्यांनी पुन्हा तो बेत रद्द केला. प्रकाशबापूंचे पुत्र माजी मंत्री प्रतीक पाटील, प्रकाशबापूंच्या पत्नी शैलजाभाभी पाटील, तसेच त्यांच्या मुलीसोबतही त्यांनी अनेकदा वार्तालाप केला होता. या सर्वांसोबत त्यांनी छायाचित्रही काढले होते. कोल्हापुरात एकदा त्यांची लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सभा झाली होती. त्याचदिवशी सायंकाळी सांगलीत सभा होणार होती. मात्र जोरदार पावसाने ही सभा रद्द झाली. प्रकाशबापूंच्या प्रचारासाठी जाता आले नसल्याची खंत त्यांनी त्यानंतर अनेकदा व्यक्त केली होती. अशा अनेक आठवणींच्या माध्यमातून राजीव गांधी सांगलीशी जोडले गेले आहेत. वंदन इस जनता को करो!सांगलीत १९८४ च्या सभेत सुरुवातीला विधानसभेचे उमेदवार विठ्ठलदाजी पाटील यांनी राजीव गांधी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजीव गांधी यांनी त्यांना रोखले आणि म्हणाले, ‘वंदन मुझे मत करो, करना है तो इस प्यारी जनता को करो.’ त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता.