शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : वसंतदादांच्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच डबघाईला : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 21:38 IST

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत

ठळक मुद्देदादांच्या वारसांवर टीका; जतमध्ये कार्यक्रम

जत : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत सहकार व सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी व्यक्त केली.जत तालुका लायन्स क्लबच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व उल्लेखनीय काम केलेल्या पतसंस्थाचालकांचा सत्कार देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. हे क्लेशकारक आहे. पुस्तकातील ज्ञानासोबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यवहारातील ज्ञान शिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेती व्यवसाय संध्या संकटात आहे. शेतकरी समृद्ध झाला, तर राष्ट्र वैभवशाली होईल.

आमदार विलासराव जगताप म्हणाले की, समाजात चांगल्या शिक्षकांची वानवा असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ऱ्हास होत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर म्हणाले की, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून समाजात काम करणाऱ्या सर्वच सहकारी संस्थांचा सन्मान होणे आवश्यक आहे. पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षणाची हमी हा शासनाचा धाडसी निर्णय आहे.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी प्रास्ताविक केले. गोपाल बजाज यांनी मनोगत व्यक्त केले. बालगाव मठाचे प्रमुख अमृतानंद महास्वामी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, दिनकर पतंगे, आप्पासाहेब नामद, डॉ. भरत हेशी, डॉ. विद्याधर किट्टद, प्रभाकर जाधव, सरदार पाटील, राजू आरळी, रेणुका आरळी, बसवराज बिराजदार, अ‍ॅड. श्रीपाद आष्टेकर, चंद्रकांत गुड्डोडगी, आर. के. पाटील आदी उपस्थित होते. संदीप लोणी यांनी आभार मानले.

 जत येथील कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमृतानंद महास्वामीजी, डॉ. रवींद्र आरळी, तम्मणगौडा रवी-पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vasantdada Patilवसंतदादा पाटीलSangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने