सांगली अर्बन बँकेचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:48 IST2021-02-28T04:48:25+5:302021-02-28T04:48:25+5:30

सांगली : सांगली अर्बन को-ऑप. बँकेचा ८६ वा वर्धापन दिन बँकेच्या सांगलीतील प्रधान कार्यालयात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात ...

Sangli Urban Bank's anniversary in excitement | सांगली अर्बन बँकेचा वर्धापन दिन उत्साहात

सांगली अर्बन बँकेचा वर्धापन दिन उत्साहात

सांगली : सांगली अर्बन को-ऑप. बँकेचा ८६ वा वर्धापन दिन बँकेच्या सांगलीतील प्रधान कार्यालयात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गुरुवर्य गुरुनाथ महाराज कोटणीस व दीपक केळकर महाराज यांनी बँकेला शुभाशीर्वाद दिले.

यावेळी श्री नवचंडी याग, श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, अल्पोपाहार व महिलांसाठी हळदी-कुंकू आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते, तसेच सभासद, ग्राहक, हितचिंतक यांच्यासाठी पान-सुपारीचा कार्यक्रमही आयोजित केला होता. यावेळी डॉ. लिमये, श्री. गणेश एंटरप्रायजेसच्या जयश्री वाघमारे, मधुरा पाटील, अनुजा पाटील, सुलभा भिडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

नितीन खाडीलकर, महेश हिंगमिरे, हरिदास पाटील, संपत पाटील, गुरुनाथ कुलकर्णी, लक्ष्मण नवलाई, प्रफुल्ल तारळेकर, अतुल गिजरे, शांतीनाथ कांते, रामकृष्ण चितळे, नारायण खाडीलकर, विजय नानवाणी, रघुनाथ पाटील, रामेश्वरलाल मालू, एम. व्ही. कुलकर्णी, विलास चितळे, दिलीप मालू, नीलेश मालू, शरदभाई शहा, हार्दिक सारडा, राजाभाऊ बावडेकर आदींसह बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतकांनी वर्धापनदिनी बँकेला शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, उपाध्यक्ष एच. वाय. पाटील, सर्व संचालक, सदस्य, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सर्व वरिष्ठ

अधिकारी,शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित होते.

Web Title: Sangli Urban Bank's anniversary in excitement