सांगलीत दुचाकी आडवी लावून दोघांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:50+5:302021-08-15T04:27:50+5:30
सांगली : इंदापूर (जि. पुणे) येथून नातेवाइकांकडे सांगलीत येत असलेल्या दोघांना दुचाकी आडवी लावून लुटण्यात आले. रोख साडेनऊ हजार ...

सांगलीत दुचाकी आडवी लावून दोघांना लुटले
सांगली : इंदापूर (जि. पुणे) येथून नातेवाइकांकडे सांगलीत येत असलेल्या दोघांना दुचाकी आडवी लावून लुटण्यात आले. रोख साडेनऊ हजार रुपयांसह मोबाइल असा १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. याप्रकरणी अविनाश जगन्नाथ धुमाळ (रा. कुंभारगाव ता. इंदापूर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास बायपास रोडवरील शिवशंभो चौक ते जुना बुधगाव रोडदरम्यान ही घटना घडली.
पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अविनाश धुमाळ व त्यांचा मित्र इंदापूरहून दुपारी चार वाजता निघून इस्लामपूरमार्गे सांगलीत येत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास ते बायपास मार्गावरील शिवशंभो चौक ते जुना बुधगाव रोड या दरम्यान आले असता, अचानक विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने धुमाळ यांच्या गाडीला आडवी गाडी मारत थांबविली व रोख पैसे व मोबाइल काढून घेतले. रात्रीच्या वेळी अचानक हा प्रकार झाल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाच्या सूचना दिल्या आहेत.