शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सांगलीत मद्यधुंद चालकाची 10 वाहनांना धडक, दोन जण थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:33 IST

दहिवडी (जि. सातारा) येथील संजय नागू राऊत (वय ३५) या मद्यधुंद चालकाने स्वत:च्या ताब्यातील ट्रक हयगयीने व अविचाराने चालवून कॉलेज कॉर्नर ते गावभागात गुरुवारी मध्यरात्री थरार माजविला.

ठळक मुद्दे: कॉलेज कॉर्नर ते गावभागापर्यंत थरारक; मद्यधुंद चालकास अटककारनाम्याची दहिवडी येथे नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली

सांगली : दहिवडी येथील संजय नागू राऊत (वय ३५) या मद्यधुंद चालकाने भरधाव ट्रक चालवत कॉलेज कॉर्नर ते गावभागात गुरुवारी मध्यरात्री थरार माजवला. रस्त्यावरील दहा वाहनांना त्याने धडक दिली. कॉलेज कॉर्नरवर रस्त्यावर बोलत उभा राहिलेल्या दोघांच्या अंगावर ट्रक घातला. मात्र ते थोडक्यात बचावले. नागरिकांनी पाठलाग करुन चालक राऊत यास पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

संजय राऊत गुरुवारी मार्केट यार्डात ट्रकने (क्र. एमएच ११ एएल ००४५) माल घेऊन आला होता. माल उतरल्यानंतर त्याने मद्यप्राशन केले. त्याला चालताही येत नव्हते. तरीही तो ट्रक चालविण्यास बसला. टिंबर एरियातून कॉलेज कॉर्नरमार्गे तो शहरात घुसला. कॉलेज कॉर्नरवर दोघेजण बोलता उभा होते. राऊतने प्रथम त्यांच्या अंगावर ट्रक घातला. प्रसंगावधान ओळखून हे दोघे बाजूने झाल्याने बचावले. त्यानंतर राऊत आमराई, गणपती पेठमार्गे टिळक चौकात गेला. तेथून तो गावभागात घुसला.

या परिसरातील रस्ते अरूंद असल्याने नागरिकांनी घरासमोर तसेच रस्त्यावरच लहान-मोठी वाहने पार्क केली होती. राऊतने सलग सात दुचाकी वाहनांना चिरडले. याशिवाय दोन मोटारीसह एका जीपला ठोकरत नेले. यामध्ये तिनही वाहनांचा चुराडा झाला.  वाहनांना ठोकरल्याचा आवाज आल्याने नागरिक जागे झाले. त्यांनी हा प्रकार पाहून ट्रकचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर गेल्यानंतर नागरिकांनी ट्रक अडविला. चालक राऊत यास खाली उतरण्यास सांगितले. पण त्याला व्यवस्थीत बोलताही येत नव्हते. तो ट्रकमधून उतरण्यास तयार नव्हता. शेवटी नागरिकांनी त्याला खाली ओढले. तो मद्यप्राशन केल्याचे लक्षात येताच त्याला चांगलाच चोप देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दाखल झाले. त्यांनी राऊतला ताब्यात घेतले. अपघातग्रस्त ट्रकही जप्त करण्यात आला. ज्या वाहनांना ठोकरले त्यांचा पंचनामा केला. पहाटेपर्यंत पंचनाम्याचे काम सुरु होते. 

वैद्यकीय तपासणीचालक राऊत याच्याविरुद्ध मद्यधुंद अवस्थेत भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास अटक करुन न्यायालयात उभे करण्यात आले. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याने केलेल्या कारनाम्याची दहिवडी येथे नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली