शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : सांगली-मिरजेतील दोन रुग्णालये सील, गर्भपात प्रकरणानंतर तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:58 IST

येथील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकांनी शुक्रवारी सांगली-मिरजेतील सर्वच रुग्णालयांची झडती घेण्याचे काम सुरू केले. त्याअंतर्गत सांगलीच्या हनुमाननगरमधील मोहिते हॉस्पिटल आणि मिरजेतील अ‍ॅपेक्स हॉस्पिटल सील केले

ठळक मुद्देअ‍ॅपेक्स हॉस्पिटलचे चालक इम्तियाज मुल्ला बीएचएमएस असून, ते आंतररुग्ण विभाग चालवित असल्याचे निष्पन्नआॅपरेशन थिएटर, खाटांची खोली सील केली.

सांगली : येथील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकांनी शुक्रवारी सांगली-मिरजेतील सर्वच रुग्णालयांची झडती घेण्याचे काम सुरू केले. त्याअंतर्गत सांगलीच्या हनुमाननगरमधील मोहिते हॉस्पिटल आणि मिरजेतील अ‍ॅपेक्स हॉस्पिटल सील केले. मोहिते हॉस्पिटलच्या चालक डॉ. सुनीता मोहिते बीएएमएस असून त्या प्रसुतिगृह चालवित होत्या, तर अ‍ॅपेक्स हॉस्पिटलचे चालक इम्तियाज मुल्ला बीएचएमएस असून, ते आंतररुग्ण विभाग चालवित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आठवडाभरापूर्वी सांगलीत चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात प्रकरण उजेडात आले. त्यानंतर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी महापालिकेची दहा पथके नियुक्त करून शहरातील सर्वच रुग्णालयांची झाडाझडती घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार या पथकांनी शुक्रवारी सांगली व मिरजेत काही रुग्णालयांची तपासणी केली. सांगलीत डॉ. छाया हंकारे व डॉ. सुमन अनिगोळ, किरण शिंदे, सुरेंद्र शिंदे, नीलेश गोधळे यांच्या पथकाने हनुमाननगर पहिल्या गल्लीत सुरू असलेल्या डॉ. सुनीता मोहिते यांच्या मोहिते हॉस्पिटल या प्रसुतिगृहाची तपासणी केली. यात डॉ. मोहिते बीएएमएस असून महापालिकेकडे रुग्णालयाची नोंद नसल्याचे आढळून आले. आॅपरेशन थिएटर आणि तीन खाटांचे रुग्णालय असल्याचे दिसून आले. यामुळे आॅपरेशन थिएटर, खाटांची खोली सील केली.

मिरजेतही डॉ. रवींद्र ताटे, डॉ. धुमाळ, सुरेंद्र शिंदे, राहुल हुलवान यांच्या पथकाने डॉ. इम्तियाज मुल्ला यांच्या अ‍ॅपेक्स रुग्णालयाची तपासणी केली. यात हे रुग्णालय महापालिकेकडे नोंदच नसल्याचे आढळून आले. तेथे दहा बेडही आढळून आले आहेत. चौकशीत डॉ. मुल्ला बीएचएमएस असल्याचे समजले. त्यांनी डॉ. समीर सय्यद हे एमबीबीएस पात्र डॉक्टर त्यांच्याकडे कार्यरत असल्याचे सांगितले. डॉ. सय्यद हज यात्रेला गेल्याने ते सध्या येथे उपलब्ध नाहीत, असेही सांगितले. त्यानंतर हे रुग्णालयही सील करण्यात आले.कॅन्सर रुग्णालयाला लाखाचा दंडमिरजेतील सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयालाही महापालिकेच्या पथकाने एक लाख रुपयांचा दंड केला. या रुग्णालयाने जैविक कचऱ्याची नियमानुसार व्यवस्था केलेली नाही. तसेच रुग्णालय परिसरात जैविक कचरा साठविला आहे. ही बाब निदर्शनास येताच डॉ. ताटे, स्वच्छता निरीक्षक पाटणकर, अनिल पाटील, सचिन वाघमोडे, निखिल कोलप यांच्या पथकाने दंड ठोठावला. या रुग्णालयाबाहेर ओल्या नारळाच्या करवंट्या टाकलेल्या होत्या. ओल्या नारळाच्या करवंट्या, डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. त्याची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगली