शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : दंडोबा डोंगर येथे रविवारी वृक्षारोपण , 29 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 17:59 IST

राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज असून, रविवार, दि. 1 जुलै रोजी दंडोबा डोंगर, भोसे येथे सकाळी 9 वाजता सांगली जिल्ह्याचा मुख्य वृक्षलागवड कार्यक्रम होणार आहे.

ठळक मुद्दे दंडोबा डोंगर येथे रविवारी वृक्षारोपण 29 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

सांगली : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज असून, रविवार, दि. 1 जुलै रोजी दंडोबा डोंगर, भोसे येथे सकाळी 9 वाजता सांगली जिल्ह्याचा मुख्य वृक्षलागवड कार्यक्रम होणार आहे.

यावेळी लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय यंत्रणाप्रमुख उपस्थित राहून वृक्षलागवड करणार आहेत. वृक्षारोपणाच्या या सामाजिक कार्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, प्राणीमित्र संघटना, निसर्ग प्रेमी, शासकीय, निमशासकीय संस्था, विविध शाळा, विद्यालये यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज आहे. सन 2018 च्या पावसाळ्यात सांगली जिल्ह्यात वन विभागासाठी 11 लाख 50 हजार, सामाजिक वनीकरण विभागासाठी 5 लाख, ग्रामपंचायतींसाठी 7 लाख 63 हजार व इतर यंत्रणांसाठी 5 लाख 4 हजार असे एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता वन विभागासह, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत व इतर यंत्रणा यांच्याकडून नियोजन केले असून वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी खड्डे खुदाई पूर्ण झाली आहे. वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या 43 रोपवाटिकेमध्ये 45 लाख रोपे उपलब्ध आहेत.

यापैकी 29 लाख 17 हजार रोपांची या वर्षी लागवड करण्यात येणार आहेत. उर्वरित रोपे पुढील वर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार आहेत. संबंधित यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर रोपलागवड साईट निश्चित केल्या असून आजमितीस 29 लाख 46 हजार रोपलागवड स्थळांची नोंद ऑनलाईन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. 29 लाख 17 हजार रोपलागवडीच्या अनुषंगाने 29 लाख 35 हजार खड्डे खुदाई करण्यात आली आहे.या कार्यक्रमामध्ये सर्वांना मोठ्या प्रमाणात सहभागी होता यावे, यासाठी www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र हरित सेना सदस्य नोंदणी सुरू आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातून 1 लाख 60 हजारहून अधिक सदस्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, निसर्गप्रेमी, प्राणीमित्र संघटना, आध्यात्मिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांनाही या कार्यक्रमात योगदान देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :environmentवातावरणSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी