सांगलीतील व्यापाऱ्याने एक कोटीचा जीएसटी चुकवला-जिल्हयातील पहिलीच कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 08:17 PM2018-11-17T20:17:59+5:302018-11-17T20:18:29+5:30

बोगस कंपन्यांद्वारे बनावट देयके तयार करून ७९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाºया पुण्यातील व्यापाऱ्याचे धागेदोरे सांगलीपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने सांगलीत विद्युत साहित्य विक्री करणाºया व्यापाऱ्यावर

The Sangli trader missed the GST of one crore - the first action in the district | सांगलीतील व्यापाऱ्याने एक कोटीचा जीएसटी चुकवला-जिल्हयातील पहिलीच कारवाई

सांगलीतील व्यापाऱ्याने एक कोटीचा जीएसटी चुकवला-जिल्हयातील पहिलीच कारवाई

Next
ठळक मुद्देपुण्याच्या पथकाचा छापा

मिरज : बोगस कंपन्यांद्वारे बनावट देयके तयार करून ७९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाऱ्या पुण्यातील व्यापाºयाचे धागेदोरे सांगलीपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने सांगलीत विद्युत साहित्य विक्री करणाºया व्यापाऱ्यावर छापा टाकून सुमारे एक कोटी रुपये वस्तू व सेवाकर बुडविल्याचे उघडकीस आणले. जीएसटी विभागाच्या पहिल्याच छाप्याच्या कारवाईमुळे सांगलीतील व्यापाऱ्यांत खळबळ उडाली होती.

बोगस कंपन्यांद्वारे बनावट देयके तयार करून ७९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर बुडविणाºया पुण्यातील मोदसिंग पद्मसिंग सोढा या व्यापाºयास जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने मुंबईत अटक केली. सोढा यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. सोढा यांनी कागदोपत्री अस्तित्व असलेल्या दहा बोगस कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांची बनावट देयके तयार केली. बनावट देयकांच्याआधारे कागदोपत्री विक्री व्यवहार करण्यात आले असून, एकाही मालाचा पुरवठा न करता तब्बल ७९ कोटी रुपये वस्तू व सेवा कराचा घोटाळा केला आहे.

सोढा याने सांगलीतील गणपती पेठेतील विद्युत साहित्य विक्री करणाºया एका मोठ्या व्यापाºयाला बनावट देयके दिल्याचे जीएसटी पुणे कार्यालयाच्या निदर्शनास आले. सोढा याच्याकडून घेतलेली बनावट देयके सादर करून सांगलीतील व्यापाºयाने वस्तू व सेवा कर भरला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जीएसटी कार्यालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालक राजलक्ष्मी कदम, प्रशांत राहणेकर, पी. एम. देशमुख, के. आर. मूर्ती, हिमांशु कुशवाह, अंकुर सिंगला यांच्या पथकाने सांगलीतील व्यापाऱ्याच्या दुकानावर छापे टाकले. दोन दिवस सुरू असलेल्या संबंधित व्यापाºयाच्या व्यवहारांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात विद्युत साहित्याच्या विक्रीसाठी बनावट देयकांचा वापर एक कोटी रुपये वस्तू व सेवा कर चुकविल्याचे निष्पन्न झाले.

संबंधित व्यापाऱ्याकडून चुकविलेल्या जीएसटी कराची रक्कम दंड व्याजासह वसूल करण्यात येणार असल्याचे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर सांगलीत ही पहिलीच छाप्याची कारवाई आहे. सोढा याच्यासोबत व्यवहार करणाºया आणखी काही शहरातील व्यापाºयांची तपासणी करण्यात येणार आहे.

Web Title: The Sangli trader missed the GST of one crore - the first action in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.