शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : अनधिकृत गौण खनिज वाहतुकीची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 12:22 IST

सांगली जिल्ह्यात दगड, माती, मुरूम या गौण खनिजांचे उत्खननाला परवानगी दिली जाते. या परवानग्या कमीत कमी वेळेत आणि एक खिडकी पद्धतीने देण्यास सुरवात केली आहे.

ठळक मुद्देअनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांकअप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण

सांगली : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार वाळूचे यांत्रिक पद्धतीने उत्खनन आणि पाण्याखालील वाळूचे उत्खनन या दोन्ही बाबींना मनाई आहे. त्यामुळे जिल्ह्यात दगड, माती, मुरूम या गौण खनिजांचे उत्खननाला परवानगी दिली जाते. या परवानग्या कमीत कमी वेळेत आणि एक खिडकी पद्धतीने देण्यास सुरवात केली आहे.त्यामुळे कोणीही अनधिकृतरीत्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक करू नये. असे केल्याचे आढळल्यास 18002332396 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण म्हणाले, शासनाकडून सांगली जिल्ह्यास सन 2018-19 या वर्षाकरिता गौण खनिजावरील स्वामित्वधन वसुलीचे 60 कोटी रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये मिरज उपविभाग 21 कोटी, जत उपविभाग 6 कोटी, विटा उपविभाग 11 कोटी, कडेगाव उपविभाग 10 कोटी व वाळवा उपविभागासाठी 12 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 100 टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी बाबनिहाय व कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.सन 2018-19 मध्ये 36 दगडखाणपट्टे यांना मंजूरी देण्यात आली आहे. मात्र अनाधिकृत दगड, माती, मुरूम, वाळू उत्खनन व वाहतूकीकडे दुर्लक्ष होवू नये आणि स्वत:हून कार्यवाही केली जावी याकरीता लिपिक, अव्वल कारकून, तलाठी, मंडल अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल यांच्यापासून नायब तहसिलदार, तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी या क्षेत्रीय स्तरावरील महसूल यंत्रणेतील सर्वांसाठी प्रमाणित कार्यपध्दती निश्चित करून देण्यात आली आहे.

त्यानुसार कोणत्याही स्तरावर अनियमितता, कर्तव्यात कसुरी आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या वर्षी एप्रिल ते जुलै या कालावधीत 88 प्रकरणात कारवाई केली असून 9 गुन्हे दाखल करून 77 लाख 25 हजार रूपये इतका दंड वसूल करण्यात आला असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी सांगितले.जिल्हास्तरीय दक्षता, उपविभागस्तरीय, तहसिलदारस्तरीय आणि ग्रामस्तरीय दक्षता समितीची स्थापना व त्यांच्यामार्फत अवैध गौणखनिज उत्खनन वाहतूक प्रकरणी कार्यवाहीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगून अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण म्हणाले, सर्व दगडखाणीची ईटीएस मशीनव्दारे मोजणी करून वसुलीची कार्यवाही पुढील एक महिन्यात पूर्ण करून घेण्यात येणार आहे. तसेच चालू मुरूम व दगडखाणपट्‌ट्याची मासिक व त्रैमासिक तपासणी होणार आहे. विनापरवानगी दगड, माती, मुरूम उत्खनन केल्या जाणाऱ्या सर्व ठिकाणांची तपासणी करून बाजारभावाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.यासाठी सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांनी 1 आठवड्याच्या आत अशा सर्व बेकायदेशीर ठिकाणांचे वस्तुनिष्ठ पंचनाम्यासह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील पाटबंधारे व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाकरिता लागणारे दगड, मुरूम इत्यादी गौणखनिज प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी त्या विभागाशी स्वत:हून संपर्क साधून सर्व परवानग्या कमीत कमी वेळेत देण्यात येणार आहेत. तसेच शासकीय जमिनीमधून अशा सर्व प्रकल्पाकरिता दगड व मुरूम गौणखनिज उत्खनन करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली