शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : ढाबा, लॉजमधील वेश्या अड्डे उदधस्त, सातजणांना अटक : मुलीसह तीन महिलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:27 IST

लवणमाची (ता. वाळवा) व हजारमाची (ता. कऱ्हाड ) येथील अनुक्रमे ओमसाई ढाबा व सम्राट लॉजवर गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून उद्ध्वस्त केला.

ठळक मुद्दे वाळवा, कऱ्हाड तालुक्यात कारवाई ढाबा, लॉजमधील वेश्या अड्डे उदधस्त, सातजणांना अटक मुलीसह तीन महिलांची सुटका

सांगली : लवणमाची (ता. वाळवा) व हजारमाची (ता. कऱ्हाड ) येथील अनुक्रमे ओमसाई ढाबा व सम्राट लॉजवर गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या १४ वर्षाच्या मुलीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्यांमध्ये ओमसाई ढाब्यावर ढाब्याचा मालक मदन संभाजी कदम (वय ३२, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा), एजंट सुयोग उर्फ शंकर पाटील (३८, कार्वेनाका, ता. कऱ्हाड ), महिला व मुलींचा पुरवठा करणारा सनी बाबूराव काळे (२४, जामखेड, जि. अहमदनगर), ग्राहक महेश लक्ष्मण जगदाळे (२४, जगदाळे मळा, मलकापूर रस्ता, कऱ्हाड ) यांचा समावेश आहे.

सम्राट लॉजच्या कारवाईत लॉजचा व्यवस्थापक शुभम पोपट कांबळे (२०, नवेखेड, ता. वाळवा) व एजंट महेश महादेव सावंत (३८, जोशी गल्ली, आजरा, जि. कोल्हापूर) या दोघांना अटक केली आहे.

छाप्याची चाहूल लागताच लॉजचा मालक हणमंत वसंत माने (शुक्रवार पेठ, आझाद चौक, कऱ्हाड ) हा पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक सातारा जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे.कऱ्हाड -तासगाव रस्त्यावरील ओमसाई ढाब्यावर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने दोन दिवसापूर्वी या ढाब्यावर जाऊन स्टिंग आॅपरेशन केले. याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी रात्री पथक पुन्हा या ढाब्यावर गेले.

बोगस ग्राहक पाठविण्यात आले. त्यानंतर छापा टाकण्यात आला. छाप्याची चाहूल लागताच ढाबा मालक, एजंट, दलाल व ग्राहकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात आले. १४ वर्षाची मुलगी व २२ वर्षाची तरुण सापडली. त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले आहे.

ढाब्यातील खोल्यांची तसेच काऊंटरची झडती घेतल्यानंतर संतती नियमन साधनांची १४ पाकीटे सापडली आहेत. ती जप्त केली आहेत. कऱ्हाड -ओगलेवाडी रस्त्यावर सम्राट लॉजमध्येही पथकाने बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला. या छाप्यात २५ तो ३० वगोटातील दोन महिला सापडल्या. ग्राहक मिळाले नाहीत.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस