सांगलीत एकाच दिवसात चोरट्यांचा ११ मोबाईलवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:26+5:302021-09-12T04:30:26+5:30

सांगली : गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत असलेल्या गर्दीचा पुरेपूर फायदा घेत चोरट्यांनी शुक्रवारी एकाच दिवसात ११ मोबाईल लंपास केले. शहरातील मारुती ...

In Sangli, thieves attacked 11 mobiles in a single day | सांगलीत एकाच दिवसात चोरट्यांचा ११ मोबाईलवर डल्ला

सांगलीत एकाच दिवसात चोरट्यांचा ११ मोबाईलवर डल्ला

सांगली : गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत असलेल्या गर्दीचा पुरेपूर फायदा घेत चोरट्यांनी शुक्रवारी एकाच दिवसात ११ मोबाईल लंपास केले. शहरातील मारुती रोड व विश्रामबाग परिसरात या चोरीच्या घटना घडल्या. त्यानुसार विश्रामबाग व शहर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.

प्रदीप शामराव हवाने (रा. मार्तंड संकूल, गुलमोहर कॉलनी, सांगली) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा एक लाख रुपये किंमतीचा मोबाईल लंपास करण्यात आला. यासह भारत तम्मा आरगे, अशोक मसाप्पा इरसूळ, प्रताप गजानन बेडगे आणि शशिकांत श्रीकांत दाबाडे यांचाही मोबाईल लंपास करण्यात आला. यात एक लाख ४७ हजार रुपये किमतीचे मोबाईल लंपास करण्यात आले. शुक्रवारी सकाळी पावणे दहा ते साडे अकराच्या दरम्यान हे प्रकार घडले.

सचिन दिनकर पाटील (रा. पार्श्वनाथ कॉलनी, धामणी रोड, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रामबाग येथील गणपती मंदिर परिसरातून मोबाईल लंपास करण्यात आले. पाटील यांच्यासह उदय यशवंत पवार, आनंदकुमार बबन राजमाने, रवीद्र मनोहर घनवट, सचिन सुरेश वडेर आणि शिवसाई रामलोट शर्मा अशा सहा जणांचे मोबाईल लंपास करण्यात आले. शुक्रवारी सकाळी पावणे दहा ते दुपारी साडेबाराच्या कालावधीत हे चोरीचे प्रकार घडले. गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठेत गर्दी असल्याने चोरट्यांनी हा प्रकार केला. सायबरच्या मदतीने पोलिसांनी मोबाईलचा तपास सुरू केला आहे.

Web Title: In Sangli, thieves attacked 11 mobiles in a single day