शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी, तीन वर्षापूर्वीची घटना : जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 16:05 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गिरीश पुरुषोत्तम गुमास्ते (वय ४५, रा. मिरज) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. गेल्या आठवड्यात न्यायालयाने गुमास्तेला दोषी ठरवले होते.

ठळक मुद्देजिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार गुमास्ते यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा पीडित मुलीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गिरीश पुरुषोत्तम गुमास्ते (वय ४५, रा. मिरज) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. गेल्या आठवड्यात न्यायालयाने गुमास्तेला दोषी ठरवले होते.पीडित मुलगी १४ वर्षाची आहे. ४ आॅगस्ट २०१५ रोजी ती घरी एकटीच होती. त्यावेळी गिरीश गुमास्ते हा तिच्या घरात शिरला व तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला होता. तत्पूर्वी बेडग (ता. मिरज) येथे ही मुलगी धार्मिक कार्यक्रमासाठी आजोळी गेली होती.गुमास्तेही तिथे गेला होता. मोटार वळवून आणण्याचा बहाणा करुन तिला मोटारीत बसवून तो घेऊन गेला होता. मोटारीतच त्याने तिच्यावर अत्याचार केले होते. ही घटना कोणाला सांगितलीस तर ठार मारेन, अशी धमकीही दिली होती. पीडित मुलीने शाळेतील मैत्रिणी व आईला हा प्रकार सांगितल्यानंतर गुमास्तेविरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सरकारतर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील विनायक तथा बाळासाहेब देशपांडे यांनी या खटल्याचे काम पाहिले. त्यांनी एकूण दहा साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, मैत्रिणी, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शिल्पा दुथडे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. न्यायालयाने गेल्या आठवड्यात गुमास्तेला दोषी ठरवले होते. शिक्षेबाबतचा शुक्रवारी निकाल दिला.नुकसान भरपाई देण्याचे आदेशन्यायालयाने गुमास्तेला दहा वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडातील दहा हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा