शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रिलायन्स ज्वेल दरोडा तपासासाठी देशभर पथके रवाना, चार महिन्यातील चौथा दरोडा, सोने विदेशात जाण्याची भीती

By शीतल पाटील | Updated: June 6, 2023 22:17 IST

Reliance Jewel robbery: रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर गेल्या चार महिन्यात देशातील विविध शहरात चार दरोडे टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या चारही दरोड्याची पद्धत जवळपास एकच आहे. त्यामुळे या दरोड्यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे.

- शीतल पाटीलसांगली : रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर गेल्या चार महिन्यात देशातील विविध शहरात चार दरोडे टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या चारही दरोड्याची पद्धत जवळपास एकच आहे. त्यामुळे या दरोड्यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे. सांगली पोलिसांची आठ पथके बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेशासह नेपाळकडेही रवाना झाली आहे. दरम्यान, चोरीतील सोने विदेशात जाण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली.

वसंतदादा मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्स या दुकानातून रविवारी भरदिवसा दरोडेखोरांनी अंदाजे २२ किलो वजनाचे १४ कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने लुटले. या दरोड्यात वापरलेली मोटार भोसे (ता. मिरज) येथील शेतात मिळून आली. तर एक दुचाकी मिरज बायपास रस्त्याला सापडली. माेटारीत चोरट्यांचे कपडे, बॅग व दाेन पिस्तुले पोलिसांना सापडली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दोन दिवसांपासून सांगलीत तळ ठोकला आहे. तपासावर त्यांनी लक्ष ठेवले आहे. अधिकाऱ्यांच्या बैठक घेत तपासाच्या सूचना देत आहेत.

गेल्या फेब्रुवारीपासून आतापर्यंत देशभरात चार ठिकाणी रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि ओडीसा या ठिकाणी पडलेल्या दरोडा आणि सांगलीतील दरोड्याची पद्धत जवळपास एकच आहे. दिल्लीतील दरोड्यात तिघांना अटक झाली आहे. पण त्यांच्याकडून सुत्रधाराबाबत फारशी माहिती मिळाली नाही. सांगलीत पडलेला दरोडा चौथा आहे. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके विविध राज्यात रवाना झाली आहे.

दुकानाबाहेर गोळीबाररिलायन्स ज्वेल्स दुकानात दरोडेखोर शिरले होते. कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी करीत त्यांना चिकटपट्टीने बांधण्यात येत होते. काही साथीदार दुकानाबाहेर रस्त्यावर होते. याचवेळी एक ग्राहक दुकानात आले. त्याने काचेतून दरोड्याचा प्रकार पाहिला. तो आरडाओरडा करू लागताच रस्त्यावर उभे असलेल्या साथीदारांनी ग्राहकाच्या दिशेने गोळीबार केला. यातच दुकानाच्या प्रवेशद्वाराची काच फुटल्याचे तपासात समोर आले आहे.दुकानाबाहेर तीन ते चार फेऱ्यादरोडेखोरांनी आधीच रिलायन्स ज्वेल्सची रेकी केली होती. त्यांचे काही साथीदार सकाळपासून दुकानाबाहेर होते, तर दरोडे टाकणारे शहरात फिरत होते. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोरांची मोटार फिरत असल्याचे दिसून येते. दुपारी मार्केट यार्ड ते टाटा पेट्रोलपंपपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला. हीच वेळ साधत दरोडेखोर दुकानात शिरल्याची माहिती मिळत आहे.

सुरक्षारक्षकांकडून स्वागतरिलायन्स ज्वेल्समध्ये कोट्यवधी रुपयांचे दागिने, हिरे असताना सुरक्षेमध्ये मोठ्या त्रुटी होत्या. दरोड्यावेळी एक महिला गार्ड होती. दरोडेखोरांनी दुकानात शिरताना तिला गोड बोलून आत आणले. तिने ग्राहकाप्रमाणेच त्यांचे स्वागत केले. दरोडेखोरांनी बंदूक काढताच तिची गाळण उडाली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी