राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत सांगलीचा संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:25 IST2021-02-12T04:25:27+5:302021-02-12T04:25:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पंढरपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत सांगली फुटबॉल अकॅडमीने फलटण जिमखाना संघाचा ४ ...

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत सांगलीचा संघ विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पंढरपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत सांगली फुटबॉल अकॅडमीने फलटण जिमखाना संघाचा ४ विरुद्ध ० अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. पंढरपूरचा विठाई संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
पंढरपुरात १९८३नंतर प्रथमच राजस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण राज्यातून २५ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना सांगली फुटबॉल अकॅडमी आणि फलटण जिमखाना यांच्यात झाला. या सामन्यात सांगली संघाने प्रारंभापासून घेतलेली आघाडीअखेरपर्यंत कायम राखली. फलटण संघाचा ४ विरुद्ध ० असा पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. विजय प्राप्त करताच संघातील सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला. या सामन्यात प्रकाश मगर, अमिल खान, इजाज चिकोडी, गोलकिपर दानेश, निखिल पोरे, सईद पटेल, अतुल कोळेकर, साई राजपूत, अझर नदाफ, ऍडी यांनी चांगला खेळ करून संघाला अजिंक्यपद मिळवून दिले.
सर्व खेळाडूंना प्रशिक्षक जुबेर जमादार, अनिल राजपूत यांचे प्रशिक्षण, तर युवानेते पृथ्वीराज पवार, शिवसेनेचे सांगली शहरप्रमुख महेंद्र चंडाळे, सुधीर कदम, अशोक नार्वेकर, राहुल जेधे यांचे प्रोत्साहन लाभले. अभिजित पाटील, मनसेचे दिलीप धोत्रे, अमित साळुंखे, युवराज अभंगराव, अनिष्ट शेख, शंकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.