वुशू स्पर्धेत सांगलीचा संघ राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:40 IST2021-02-23T04:40:21+5:302021-02-23T04:40:21+5:30

वुशू स्पर्धेत सांगलीच्या संघाने यश मिळविले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वुशू खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली जिल्हा संघाने यश ...

Sangli team ranks third in the state in wushu competition | वुशू स्पर्धेत सांगलीचा संघ राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

वुशू स्पर्धेत सांगलीचा संघ राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

वुशू स्पर्धेत सांगलीच्या संघाने यश मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वुशू खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली जिल्हा संघाने यश मिळविले. कनिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेत व युवा गटातील सान्सू प्रकारात चार सुवर्ण, पाच रौप्य व चार कांस्यपदके पटकाविली. सांगलीने राज्यस्तरावर तिसरा क्रमांक पटकाविला. निकाल असा : सान्सू युथ - विकास भोसले, ऋषिकेश ढोबळे, कर्णराज शिंदे, अनिकेत टोमके (सर्व रौप्यपदके), भावेश चव्हाण, निकिता होवाळ, सानिका माने, गायत्री यादव (कांस्य), सोनाली जाधव, मानवी बरगाले (सुवर्ण).

सान्सू कनिष्ठ : निखिल शिंदे (रौप्य), गीतांजली चव्हाण, प्रीती पाटील (सुवर्ण). सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड हरियाणा येथील राष्ट्रीय स्पर्धांसाठी झाली आहे. त्यांना वुशू असोसिएशनचे राज्य महासचिव सोपान कटके, सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, श्रीकांत खळदकर, सुरेश चौधरी, आदींनी मार्गदर्शन केले.

Web Title: Sangli team ranks third in the state in wushu competition