शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : विद्यार्थ्यांनी छेडल्या तंतुवाद्यांच्या संशोधन तारा, मिरजेतील सफर : शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमाचा भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 14:07 IST

पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेल्या अविष्कार संशोधन उपक्रमाअंतर्गत मिरजेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी तंतुवाद्यांच्या माहेरघराची सफर केली. वाद्यांच्या निर्मितीच्या संशोधन तारा छेडत या विद्यार्थ्यांनी या सफरीचा आनंद लुटला.

ठळक मुद्देमिरज शहरात १८५० साली पहिले तंतुवाद्य तयारभारतीय तंतुवाद्य केंद्र, सरस्वती तंतुवाद्य केंद्र या ठिकाणांना भेट विद्यार्थ्यांनी पाहिली तंबोरा, सतार, सारंगी, दिलरूबा,रूद्रवीणा, ताऊस वाद्ये अभ्यास सहलीतून विद्यार्थ्यांसमोर उलगडला तंतुवाद्यनिर्मितीचा दीडशे वर्षांचा इतिहास

मिरज : पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेल्या अविष्कार संशोधन उपक्रमाअंतर्गत मिरजेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी तंतुवाद्यांच्या  माहेरघराची सफर केली. वाद्यांच्या निर्मितीच्या संशोधन तारा छेडत या विद्यार्थ्यांनी या सफरीचा आनंद लुटला.शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तंतुवाद्यनिर्मितीसाठी जगप्रसिध्द असणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्यनिर्मिती केंद्रांना भेट देऊन वाद्यनिर्मितीचा इतिहास आणि सध्यस्थिती जाणून घेतली. इतिहास विभागाच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मिरज शहर हे तंतुवाद्यनिर्मितीसाठी प्रसिध्द आहे. तंतुवाद्यनिर्मितीचा इतिहास आणि निर्मितीप्रक्रीया विद्यार्थ्यांना समजावी, या हेतूने साळुंखे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अभ्याससहल येथे आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ. उदयसिंह माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागप्रमुख डॉ. अर्चना जाधव यांनी या अभ्यास सहलीचे आयोजन केले.मिरज शहरात १८५० साली ज्या ठिकाणी पहिले तंतुवाद्य तयार झाले, त्या भारतीय तंतुवाद्य केंद्र आणि सरस्वती तंतुवाद्य केंद्र या ठिकाणांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी वाद्यनिर्मितीचा इतिहास जाणून घेतला. तंबोरा, सतार, सारंगी, दिलरूबा,रूद्रवीणा, ताऊस अशी वाद्ये विद्यार्थ्यांनी यावेळी पाहिली.

या वाद्यांमधील फरक समजावून घेतला. मजीद सतारमेकर,अलताफ सतारमेकर, आतीक सतारमेकर यांनी ही वाद्ये कशी तयार करतात, याचे प्रात्यक्षीक करून दाखवले. कोणतीही यांत्रीक साधने न वापरता केवळ हस्तकौशल्याच्या जोरावर ही वाद्ये तयार होत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.फरीदसाहेब सतारमेकर यांनी १८५० साली प्रतिकूल परिस्थितीमधून कशा पध्दतीने वाद्य तयार केले?, वाद्यासाठी लागणारे विशिष्ट प्रकारचे भोपळे कुठून मागवले जातात?, यांसह अन्य प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

तंतुवाद्य कारागीरांच्या सध्याच्या समस्या काय आहेत, त्यांना शासनाकडून काही सहाय्य होते का? याचीही माहिती यावेळी घेण्यात आली. या अभ्यास सहलीतून तंतुवाद्यनिर्मितीचा दीडशे वर्षांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. 

टॅग्स :Sangliसांगलीcultureसांस्कृतिक