सांगलीत शाळकरी मुलीचा विनयभंग

By admin | Published: December 6, 2015 12:32 AM2015-12-06T00:32:54+5:302015-12-06T00:32:54+5:30

प्रेमप्रकरणातून मारहाण : दोघांना अटक

Sangli school girl molested | सांगलीत शाळकरी मुलीचा विनयभंग

सांगलीत शाळकरी मुलीचा विनयभंग

Next

सांगली : प्रेमप्रकरणातून सोळावर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथे घडला. मुलीस मारहाणही करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित तरुणासह त्याच्या मावशीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली.
सद्दाम हसन सय्यद (वय २१) व वहिदा इब्राहिम शेख (३५, दोघे रा. नेहरूनगर, कुपवाड रस्ता, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सद्दाम याचे पिडित मुलीवर प्रेम होते. ती दहावीत शिकते. काही दिवसापूर्वी सद्दामचा नात्यातील तरुणीशी विवाह ठरला आहे. त्याचा साखरपुडाही झाला आहे. तरीही तो पिडित मुलीच्या मागे लागला होता. शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी निघाली होती. त्यावेळी सद्दामने तिला अडविले. माझ्या तुझ्यावर अजूनही प्रेम आहे, असे सांगितले. यावर पिडित मुलीने माझा नाद सोड, तुझा साखरपुडा झाला आहे, असे सांगितले. त्यामुळे सद्दामला राग आला. यावेळी त्याची मावशी वहिदा शेखही तिथे आली. तिनेही मुलीस मारहाण केली. रात्री उशिरा तिने या दोघांविरुद्ध संजयनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Sangli school girl molested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.