शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

सांगली : संदीप मोहिते-चौगले यांचे दोन दिवसांत निलंबन, प्रस्ताव तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 18:41 IST

कंत्राटी परिविक्षा अधिकाऱ्यास पुनर्नियुक्ती देऊन कामावर हजर करून घेण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा व बालविकास अधिकारी संदीप दौलतराव मोहिते, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद नारायण चौगुले व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेंद्र कृष्णा भाट यांच्यावर दोन दिवसांत निलंंबनाची कारवाई होणार आहे. आयुक्त कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. ही कारवाई मंत्रालय स्तरावर होत असते. त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम बुधवारी आयुक्त कार्यालयात सुरू होते.

ठळक मुद्देसंदीप मोहिते-चौगले यांचे दोन दिवसांत निलंबन आयुक्तालयात प्रस्ताव तयार शासनाकडून होणार कारवाई

सांगली : कंत्राटी परिविक्षा अधिकाऱ्यास पुनर्नियुक्ती देऊन कामावर हजर करून घेण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा व बालविकास अधिकारी संदीप दौलतराव मोहिते, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद नारायण चौगुले व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेंद्र कृष्णा भाट यांच्यावर दोन दिवसांत निलंंबनाची कारवाई होणार आहे.

आयुक्त कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. ही कारवाई मंत्रालय स्तरावर होत असते. त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम बुधवारी आयुक्त कार्यालयात सुरू होते.संदीप मोहिते व चौगले हे दोघेही कोल्हापुरात राहतात. मोहिते हा कोल्हापूर शहर बालविकास प्रकल्प अधिकारी आहे. त्यांच्याकडे सांगली जिल्हा महिला बालविकास विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. मोहिते व चौगले हे ‘वर्ग एक’ आणि ‘दोन’चे अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाचे अधिकार मंत्रालय स्तरांवर आहेत.

‘बाल संरक्षण अधिकारी’ हे पद कंत्राटी स्वरूपाचे आहे. एकात्मिक बाल संरक्षण कक्ष हा विभागच कायमस्वरूपी कंत्राटी स्वरूपात आहे. त्यामुळे भाट यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरील असते.

सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे खात्याकडून त्यांच्यावरील कारवाई लांबली तर सरकारवर टीका होऊ शकते, या भीतीपोटी या अधिकाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईची सूत्रे वेगाने हलली आहेत. 

 

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार