सांगलीत ‘रिक्षामामां’चा विद्यार्थी प्रवास महागला!

By Admin | Updated: June 17, 2014 00:46 IST2014-06-17T00:39:42+5:302014-06-17T00:46:05+5:30

संघटनांचा निर्णय : पन्नास ते शंभर रुपयांची दरवाढ

Sangli 'Rikshamam' students travel expensive! | सांगलीत ‘रिक्षामामां’चा विद्यार्थी प्रवास महागला!

सांगलीत ‘रिक्षामामां’चा विद्यार्थी प्रवास महागला!

सचिन लाड, सांगली : पेट्रोल आणि डिझेलची सातत्याने दरवाढ होत असल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा संघटनांनी जून महिन्यापासून विद्यार्थी वाहतुकीत दरवाढ केली आहे. स्थानिक पातळीवर पन्नास रुपये आणि पाच किलोमीटर अंतर असेल तर शंभर रुपये दरवाढ झाली आहे. शालेय साहित्याबरोबरच ‘रिक्षावाले मामां’चा प्रवासही महागल्याने पालकांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. या दरवाढीबाबत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मात्र कोणतीही कल्पना दिलेली नाही.
गेल्या चार-पाच वर्षात जिल्ह्यातील ३२६ शाळांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी बसची सोय केली आहे. चारचाकी वाहनांतूनही विद्यार्थी वाहतूक सुरू आहे, परंतु ‘रिक्षावाले मामां’साठी मागणी कायम आहे. मुलांना रिक्षातूनच शाळेत सोडण्याचा पालकांचा कल कायम आहे. क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी बसवले जातात. मात्र रिक्षाचा वाहतुकीचा दर परवडत असल्याने पालकांची शहरातील रिक्षा वाहतुकीबद्दल कोणतीही तक्रार नसते.

Web Title: Sangli 'Rikshamam' students travel expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.