सांगली : जिल्ह्यातील मतदान यंत्रणा सज्ज-- कडक पोलिस बंदोबस्त :
By Admin | Updated: October 14, 2014 23:26 IST2014-10-14T22:54:45+5:302014-10-14T23:26:11+5:30
इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रे रवाना; कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रे ताब्यात

सांगली : जिल्ह्यातील मतदान यंत्रणा सज्ज-- कडक पोलिस बंदोबस्त :
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (१५) रोजी मतदान होत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आठही विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रे केंद्राकडे रवाना झाली आहेत. सायंकाळी मतदान कर्मचाऱ्यांनी केंद्राचा ताबा घेतला आहे. जिल्ह्यातील चुरशीच्या लढती पाहता पोलिसांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जादा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी बाहेरच्या राज्यातूनही पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त मतदानासाठी जागृती मोहिमही राबविली आहे.
इस्लामपूरात दहा केंद्रांच्या मतदानाचे थेट प्रक्षेपण
पलूस कडेगावमध्ये अडीच लाख मतदार
खानापूरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त
शिराळ्यात दोन लाख ७४ हजार मतदार हक्क बजाविणार
जतमध्ये मतदानासाठी दीड हजार कर्मचारी तैनात
निर्भयपणे मतदान करा
खानापूर मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन खानापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
‘तासगाव’मध्ये २८५ केंद्रे सज्ज
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २८५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. केंद्रावर अधिकारी, कर्मचारी आज दुपारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले. तासगावातील ४८, तर कवठेमहांकाळमधील ६० गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. तासगाव तालुक्यात १५३, तर कवठेमहांकाळ तालुक्यात १३२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (वार्ताहर)