शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कर्नाटकातील साईभक्तांसाठी सांगली रेल्वे स्थानकाचा सेतू, राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा फायदा 

By अविनाश कोळी | Updated: March 27, 2024 19:11 IST

प्रवासी संघटनांकडून आवाहन

सांगली : कर्नाटकातून लाखो साईभक्त वर्षभरात महाराष्ट्रातील शिर्डी देवस्थानला जात असतात. या सर्व साईभक्तांसाठी आता सांगलीरेल्वे स्थानक सेतूचे काम करणार आहे. राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळा त्यांच्यासाठी सोयीच्या होणार असून यातून सांगलीतील अनेक ऐतिहासिक मंदिरांना भेट देणे कर्नाटकातील भाविकांना शक्य होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपने याबाबत कर्नाटकातील भाविकांना सोशल मिडियावर आवाहन केले आहे. कर्नाटकातील भाविकांना थेट शिर्डीला जाण्यासाठी गाडी नाही. त्यामुळे खासगी किंवा महामंडळाच्या बसने त्यांना प्रवास करावा लागतो. गाड्या बदलाव्या लागताहेत. मात्र, आता सांगली रेल्वे स्थानकावरुन सुरु झालेल्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमुळे कर्नाटकातील भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. याशिवाय सांगली शहराजवळ असलेल्या अनेक मंदिरांना भाविक भेटी देणार असल्याने त्याठिकाणचे पर्यटनही वाढणारा आहे. सांगली रेल्वे स्थानकावरील या एक्स्प्रेसमुळे बेंगलोर, हुबळी, धारवाड, दावणगिरी, बेळगाव येथील भाविनांची सोय होईल.

असा करता येणार प्रवासप्रवासी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस दररोज रात्री ११ वाजता बेंगलोरमधून सुटते. त्या गाडीतून कर्नाटकातील संबंधित मार्गावरील साईभक्तांनी सांगली स्थानकापर्यंत यावे. ही गाडी दुपारी साडे बारा वाजता सांगलीत पोहचते. सांगलीतील काही मंदिरांना भेट देऊन सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने त्यांना थेट कोपरगावपर्यंत जाता येते.

परतीच्या प्रवासातही महाराष्ट्र एक्स्प्रेसने सांगलीपर्यंत सकाळी १० वाजता येता येते. याठिकाणी आणखी काही देवस्थानांना भेटी देऊन दुपारी ३ वाजता राणी चेन्नम्मा एक्सप्रेस पकडून गावी परतता येते.

या ठिकाणांना भेट देणे शक्यसांगलीतील गणपती मंदिर, हरीपूर येथील बागेतील गणपती मंदिर, हरीपूरचे संगमेश्वर मंदिर, संगम, औदुंबर येथील दत्त मंदिर, दंडोबा अभयारण्य, काशिलिंग देवस्थान आदी ठिकाणी कर्नाटकातील भाविकांना भेट देता येऊ शकते, असे प्रवासी संघटनांनी सुचविले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेSaibaba Mandirसाईबाबा मंदिरKarnatakकर्नाटक