शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा 'फुन्सूक वांगडू'.... मराठमोळ्या प्राध्यापकाकडे तब्बल ७५ संशोधनांचे पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 16:47 IST

अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिले पेटंट नावावर केले होते.

ठळक मुद्देसांगलीच्या प्राध्यापकाकडे ७५ संशोधनांचे पेटंटपूर्णपणे भारतीय बनावटीचे मायक्रोस्कोप, डिजिटल उपकरणे तयार

सांगली : फार्मसीचे शिक्षण घेत असतानाच लागलेली संशोधनाची आवड. तेव्हाच पॉकेट मनीतून मिळविलेले पेटंट आणि त्यानंतर प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना मेक इन इंडिया उपकरणांच्या संशोधनासाठी आतापर्यंत मिळविलेले ७५ पेटंट ही आगळीवेगळी किमया साधली आहे सांगलीचे प्रा. सचिन लोकापुरे यांनी. संशोधन क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असून. लोकापुरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे सांगलीच्या नावलौकिकात भर पडली आहे.मिरजेचे रहिवासी असलेले व येथील आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले सचिन गंगाधर लोकापुरे यांनी औषध निर्माण शास्त्रात उपयोगी ठरणाऱ्या उपकरणांचा अभ्यास केला आहे. केवळ संशोधन करूनच न थांबता त्यांनी पेटंट घेऊन जागतिक पातळीवर संशोधन नेले आहे.लोकापुरे यांनी फार्मसीतील पदवीचे शिक्षण घेत असतानाच संशोधनाच्या पेटंटला सुरुवात केली. अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिले पेटंट नावावर केले होते. वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणाऱ्या अनेक यंत्रांमध्ये त्रुटी होत्या. यामुळे निदान करताना अडचणी येत होत्या. ही यंत्रे डिजिटल करण्यास लोकापुरे यांनी सुरुवात केली. नंतर ते त्यांचे पेटंट घेऊ लागले. सध्या त्यांच्याकडे पाच युटिलिटी आणि ७० इंडस्ट्रीयल डिझायनिंग पेटंट आहेत.वैद्यकीय महाविद्यालये, विज्ञान महाविद्यालये, औषध निर्माण शास्त्र शाखांसह जेथे सूक्ष्मदर्शकाच्या (मायक्रोस्कोप) माध्यमातून संशोधन केले जाते, तेथे लोकापुरे यांनी तयार केलेली उपकरणे वापरली जातात. वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोगांचे सूक्ष्मनिदान करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅबची आवश्यकता असते. तेथे जपान, चीनमधून मायक्रोस्कोप मागविले जातात.आता लोकापुरे यांच्या संशोधनामुळे मेक इन इंडिया उपकरणे वापरली जात आहेत. पूर्णपणे भारतीय बनावटीचे मायक्रोस्कोप, डिजिटल उपकरणे त्यांनी स्वत: तयार केली आहेत.

टॅग्स :Professorप्राध्यापकSangliसांगली