शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात, सुरेश पाटील : राष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 15:19 IST

श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महामस्तकाभिषेक सोहळा समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

ठळक मुद्देमहामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देश,विदेशातून ८० लाखाहू अधिक भाविक उपस्थित राहणार रुग्णालय, प्राकृत विद्यापीठ स्थापणार

सांगली : श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महामस्तकाभिषेक सोहळा समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सानिध्यात व स्वतिश्री जगदगुरू चारुकिर्ती भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा होत आहे. त्यासाठी देश,विदेशातून ८० लाखाहू अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रवणबेळगोळ येथील विंध्यगिरी पर्वतावरील महामस्तकाभिषेकासाठी जर्मन तंत्रज्ञानांचा वापर करून चार मजली पहाड उभारण्यात आला आहे.

पर्वतावर ये-जा करण्यासाठी दोन लिफ्ट व अभिषेक सामुग्रीसाठी स्वतंत्र लिफ्टची सोय केली आाहे. दररोज ८ हजार लोक पहाडावर जाऊ शकतात. बाहुबलींच्या मुर्तीवर काहीही परिणाम होऊ नये, यासाठी पुरातन विभागाने विशेष रसायनाचा लेप दिला आहे.

आवास व्यवस्थेसाठी ११ नगरांची रचना केली आहे. त्यात ३० हजार लोक राहू शकतील. ५ हजारहून अधिक कॉटेज उभारले आहेत. दररोज ३ लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यात ३० आचार्य व ४०० हून अधिक मुनी व हजारो त्यागीगण सहभागी होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र त्यागीनगरची उभारणी करण्यात आाली आहे.

चंद्रगिरी पर्वतावरून मस्तकाभिषेक पाहता यावा, यासाठी एक लाख लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.या सोहळ्याचे उद््घाटन ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते केले जाणार आहे.

सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची बुधवारी भेट घेऊन त्यांनाही निमंत्रित केले जाणार आहे. कर्नाटक सरकारने या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.रुग्णालय, प्राकृत विद्यापीठ स्थापणारमहामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर श्रवणबेळगोळ येथे ५० कोटी रुपये खर्चाचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. २० एकर जागेत सर्वसोयीनीयुक्त २०० खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. तसेच याठिकाणी प्राकृत विश्वविद्यापीठही स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारने २० कोटीचा निधी मंजूर केला असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :SangliसांगलीTempleमंदिर