शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार तपास जाळेप्रणालीत सांगली पोलीस राज्यात नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 09:52 IST

सीसीटीएनस (क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम) अर्थात गुन्हे आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणालीच्या राज्यस्तरीय कामकाजात सांगली पोलीस दलाने अव्वल क्रमांक मिळविला आहे.

ठळक मुद्देगुन्हेगार तपास जाळेप्रणालीत सांगली पोलीस राज्यात नंबर वनतपासणीत १०० टक्के गुण; आॅनलाईन कामकाजात अचूकता

सांगली : सीसीटीएनस (क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम) अर्थात गुन्हे आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणालीच्या राज्यस्तरीय कामकाजात सांगली पोलीस दलाने अव्वल क्रमांक मिळविला आहे.

जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये दैनंदिन प्रभावी वापर, अचूकता आणि नागरिकांच्या ई-तक्रारींची पूर्तता यामुळे १०० टक्के गुण जिल्हा पोलीस दलाला मिळाले आहेत.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सीसीटीएनएस प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. नागरिकांना कोणताही त्रास न होता सर्व पोलीस ठाण्याचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करत आॅनलाईन कामावर भर दिला जात आहे.

पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. तंत्रज्ञानावर आधारित कामकाजात पोलिसिंग कामात सातत्य ठेवल्यानेच प्रथम क्रमांक मिळविला आहे.

कोरोनाचा कहर लक्षात घेता, पोलीस दलही कोरोना नियंत्रणासाठी व्यस्त आहे. अशा परिस्थितीतही सीसीटीएनएस प्रणालीचा योग्य वापर करण्यात आला आहे. या प्रणालीच्या कामकाजाच्या नोडल अधिकारी मनीषा दुबुले यांनी नियमित आढावा घेतल्याने प्रभावी काम झाले आहे.

राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कक्षाचे नितीन बराले, कावेरी हावगोंडी, तेजश्री पाटील, सिटीनझन पोर्टलच्या निरीक्षक विशाखा पाटील आणि या प्रणालीच्या कामकाजात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अधीक्षक शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक दुबुले यांनी अभिनंदन केले आहे.राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जुलै महिन्यात याबाबत राज्यस्तरावर तपासणी केली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून विभागाने दिलेल्या सर्व मानकांमध्ये सांगली पोलीस दलास १०० टक्के गुण मिळाले आहेत. यापूर्वीही २०१९ मध्ये तपासणीत जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला होता.

 

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली