सांगलीत प्लायवूड दुकानातील मालावर कामगारांचा डल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

By शरद जाधव | Updated: August 26, 2022 21:04 IST2022-08-26T21:04:08+5:302022-08-26T21:04:22+5:30

११ लाख रुपयांचा माल लंपास

Sangli Plywood Shop theft by workers over goods; A case has been registered against four | सांगलीत प्लायवूड दुकानातील मालावर कामगारांचा डल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

सांगलीत प्लायवूड दुकानातील मालावर कामगारांचा डल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

शरद जाधव 

सांगली : शहरातील पत्रकारनगर येथील सत्यम प्लायवूड सेंटरमध्ये तीन कामगारांनीच अन्य एका साथीदाराच्या मदतीने ११ लाख ९ हजार २९७ रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी गिरीष गोपाल खत्री (रा. कोल्हापूर रोड, सांगली) यांनी राहूल मानसिंग केंगार, सतीश मानसिंग केंगार (दोघेेही रा. काळीवाट, सांगली), संजय सुभाष माने (धनगर गल्ली, सांगली) व मंगेश गायकवाड (रा. सिव्हिल हॉस्पिटलजवळ, सांगली) यांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जानेवारी २०२२ ते १३ ऑगस्टपर्यंत हा प्रकार घडला. फिर्यादी खत्री यांचे पत्रकारनगर येथे सत्यम प्लायवूड सेंटर म्हणून दुकान आहे. या दुकानात संशयित राहुल, सतीश व संजय काम करतात. त्यांनी मंगेश या संजयच्या मित्राच्या साथीने दुकानातील हार्डवेअरचा माल चोरी केला. खत्री यांच्या लक्षात चोरीचा प्रकार येताच त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सर्व संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangli Plywood Shop theft by workers over goods; A case has been registered against four