शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

सांगलीत मतदान घटल्याचा फटका संजयकाका की विशाल पाटलांना?, निकालाच्या चर्चांना उधाण

By अशोक डोंबाळे | Updated: May 9, 2024 15:29 IST

सांगलीत ४.४३ टक्के मतांची घट; चंद्रहार चमत्कार दाखविणार का?

अशोक डोंबाळे सांगली : सांगली लोकसभेसाठी २०१९ मध्ये ६५.३८ टक्के मतदान झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत ३.११ टक्के मतदानाची घट होऊन ६२.२७ टक्के मतदान झाले. पण, या घटलेल्या टक्केवारीचा फटका भाजपचे खासदार संजय पाटील यांना की अपक्ष विशाल पाटील यांना बसणार, याविषयी तर्कवितर्क मतदारांमध्ये सुरू आहेत. या दोघांना धक्का देऊन महाविकास आघाडीचे पैलवान चंद्रहार पाटील चमत्कार दाखविणार, अशी चर्चा रंगली आहे.सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदार याद्यांतील घोळ, ईव्हीएममधील बिघाड, तुरळक वादावादी वगळता ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभावी जनजागृतीकडे पाठ फिरवून नागरिकांनी मतदान करण्यास निरुत्साह दाखवला. सांगली लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपचे संजय पाटील आणि उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील अशी दुरंगी लढत होईल की काय, अशी चर्चा सुरवातीला रंगली होती. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली. यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीने तिरंगी झाली. २०१९ मध्ये ६५.३८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत संजय पाटील यांनी बाजी मारली होती. पण, या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील राहिले होते. यामुळे २०२४ च्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीकडे सर्वांचेच लक्ष होते. पण, मतदार आणि प्रशासनाच्या निरुत्साहामुळे मतदानाची आकडेवारी ३.११ टक्क्यांनी घट होऊन ६२.२७ टक्के मतदान झाले.

दीड लाख मताधिक्य मिळण्याचा दावा साडेचार टक्के घटलेल्या मतदानाचा फटका संजय पाटील यांना बसणार की विशाल पाटील यांना हे ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे. हे जरी खरे असले तरी संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्या समर्थकांनी मीच दीड लाखांवर मताधिक्याने विजयी होईन, असे दावा केला आहे.

जयंत पाटील यांचा अंदाज उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील सध्या तरी शांत आहेत. पण, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव चंद्रहार किंवा विशाल पाटील करतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. हा दावा जयंत पाटील यांनी कशाचा आधारावर केला असवा, अशी चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे. 

मिरजमध्ये ०.४८ टक्के वाढ मतदानाची सर्वाधिक घट ५.३९ टक्के खानापूर विधानसभा मतदारसंघात झाली आहे. त्यानंतर पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात ५.१९ टक्के घट झाली आहे. तसेच सर्वात कमी मतदानाची घट २ टक्के सांगली आणि २.०७ टक्के जत विधानसभा मतदारसंघात झाली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात ३.२५ टक्के घट झाली. तसेच मिरज मतदारसंघात ०.४८ टक्के मतदान वाढले.

२० निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारीवर्ष    टक्केवारी१९५१    ६०.६९१९५७    ६५.७८१९६२    ६६.०३१९६७    ६७.८११९७१    ५८.२११९७७    ५७.६०१९८०    ६४.०४१९८३    ५८.९५१९८४    ६५.०५१९८९    ५८.६५१९९१    ५१.८०१९९६    ५८.०४१९९८    ५९.६२१९९९    ६८.४७२००४    ५८.४१२००६    ५०.५७२००९    ५२.१२२०१४    ६३.४६२०१९    ६५.७८२०२४    ६०.९५

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारीविधानसभा मतदारसंघ - २०१९  - २०२४तासगाव - ६९.३३  -६६.०८सांगली - ६२.९७ - ६०.९७खानापूर  - ६४.३२ - ५८.९३पलूस -  ६७.५४  - ६२.३५जत  - ६२.८३  - ६०.७६मिरज  - ६४.३१ -  ६४.७९एकूण  - ६५.३८ -  ६२.२७

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjaykaka patilसंजयकाका पाटीलvishal patilविशाल पाटीलchandrahar patilचंद्रहार पाटील