सांगलीत वृद्धेचे घर फोडून पावणेदोन लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:07+5:302021-07-04T04:19:07+5:30
सांगली : शहरातील शास्त्री चौक परिसरात राहण्यास असलेल्या वृद्ध महिलेचे घर फोडून चोरट्यांनी एक लाख ७६ हजार रुपये किमतीचे ...

सांगलीत वृद्धेचे घर फोडून पावणेदोन लाखांचे दागिने लंपास
सांगली : शहरातील शास्त्री चौक परिसरात राहण्यास असलेल्या वृद्ध महिलेचे घर फोडून चोरट्यांनी एक लाख ७६ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी रोहिणी श्रीकांत साळुंखे यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला.
राधिका बाबूराव साळुंखे हरिपूर रोडवर एकट्याच राहण्यास आहेत. गुरुवारी सकाळी त्या पाय घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. दुखापत झाल्याचे त्यांनी सून रोहिणी यांना सांगितल्यानंतर त्यांनी राधिका यांना खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले होते. या कालावधीत घरी कोणीही नसल्याने चोरट्यांनी संधी साधत घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातील साहित्य विस्कटत साळुंखे यांनी डब्यात ठेवलेले १६ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांच्या हाती लागले. चोरट्यांनी दोन पाटल्या, दोन बांगड्या, साडे चार तोळ्यांचा लक्ष्मी हार, असा एकूण १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. शनिवारी सकाळी साळुंखे यांच्या शेजाऱ्यांना घराची कडी तुटल्याचे लक्षात आले. त्यानंतर याची माहिती देण्यात आली. यानंतर रोहिणी साळुंखे यांनी शहर पोलिसांत याबाबत फिर्याद दाखल केली आहे.