शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’त सांगली डावलली, विमानतळाला निधी का नाही?; विशाल पाटील यांचा संसदेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:57 IST

टेंभू, म्हैसाळला निधी देण्यात आखडता हात

सांगली : सांगलीचा स्मार्ट सिटीत समावेश का करण्यात आला नाही. आमच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात तरतूद का करण्यात आली नाही. टेंभू आणि म्हैसाळ विस्तारित योजनांसाठी ए.आय.बी.पी. योजनेतून निधी देण्यात सरकार आखडता हात का घेत आहे, असा सवाल करत खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी संसदेत हल्लाबोल केला. अर्थसंकल्पावरील भाषणात त्यांनी महाराष्ट्रावरील अन्यायाचाही पाढा वाचला.विशाल पाटील म्हणाले, सांगलीला अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. दीड तासाच्या भाषणात एकदाही महाराष्ट्राचे नाव घेतले गेले नाही. आसाम, बिहारमधील महापुराचा उल्लेख झाला. महाराष्ट्रातील महापुराच्या नुकसानीवर त्या बोलल्या नाहीत. सांगली मतदारसंघाची अपेक्षा आहे स्मार्ट सिटीत येण्याची. इथे विमानतळाला निधी दिला नाही.बिहारमधील सिंचनासाठी तुम्ही निधीची तरतूद केली, मात्र टेंभू, म्हैसाळ योजनेचा उल्लेख करण्याची गरज तुम्हाला वाटली नाही. कराचा ३७ टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो, भारताच्या जीडीपीचा १४ टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो. पाच ट्रिलियन इकॉनॉमीची स्वप्ने पाहताना त्यात एक ट्रिलियन वाटा महाराष्ट्राचा असला तरच ते शक्य होणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाशिवाय भारताचा विकास अशक्य आहे.

अर्थसंकल्पाचा दिग्दर्शक हीच अडचणविशाल पाटील म्हणाले, अर्थसंकल्पावर खूश असणारे काही खासदार मला म्हणाले, हा फक्त ट्रेलर आहे. मात्र अडचण अशी आहे की ट्रेलर पाहून पिक्चरचा अंदाज लागत नाही. मी परवा एक ट्रेलर पाहून बायकोसोबत सिनेमाला गेलो, अर्धा तासात कंटाळून बाहेर पडलो. अर्थसंकल्पाची अवस्था अशीच आहे. कारण, या अर्थसंकल्पाचा दिग्दर्शक हीच अडचण आहे.

टॅग्स :Sangliसांगलीvishal patilविशाल पाटील