शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे, डॉ. राजा दयानिधी यांची मुंबईला बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:39 IST

सांगली : सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची मुंबई येथे सिडकोचे सहव्यवस्थापक म्हणून बदली झाली आहे. तसेच सांगलीचे नूतन ...

सांगली : सांगलीचेजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची मुंबई येथे सिडकोचे सहव्यवस्थापक म्हणून बदली झाली आहे. तसेच सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील ‘सारथी’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची नियुक्ती केली आहे.डॉ. राजा दयानिधी यांनी सांगली जिल्हाधिकारी म्हणून १९ जुलै २०२२ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांच्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका शांततेत पार पडल्या. २०२४ मध्ये आलेल्या पूर आणि अतिवृष्टीच्या काळात त्यांनी चांगले काम केले. शासकीय दस्तावेज एकत्रित करण्याची राज्यातील सर्वाधिक चांगली कामगिरी सांगलीत झाली. स्वत: डॉक्टर असल्यामुळे सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात मूलभूत सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.नूतन जिल्हाधिकारी म्हणून अशोक काकडे यांची नियुक्ती मंगळवारी झाली. ते पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्थेच्या (सारथी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांना ‘सेवारत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वी सांगलीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना कामाचा अनुभव आहे.आज पदभार स्वीकारणारनूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे हे बुधवारी सकाळी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून पदभार स्वीकारतील. काकडे यांना सांगली जिल्ह्याची माहिती असल्यामुळे विकास कामाला ते चांगली गती देऊ शकतात, अशी अपेक्षा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी