शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत राष्ट्रवादीचे ‘दे धक्का’ आंदोलन, इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:59 IST

भाजप सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीविरोधात सोमवारी सांगली शहर, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दुचाकी ढकलत दे धक्का आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देसांगलीत राष्ट्रवादीचे ‘दे धक्का’ आंदोलन, इंधन दरवाढीचा निषेध दुचाकी ढकलत शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी

सांगली : भाजप सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीविरोधात सोमवारी सांगली शहर, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दुचाकी ढकलत दे धक्का आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.येथील स्टेशन चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली. स्टेशन चौकातून राजवाडा चौकापर्यंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत नेल्या. मोदी सरकार हाय हाय.., मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तासभर चाललेल्या या आंदोलनात जोरदार निदर्शनेही करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात महटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यअच्छे दिनह्णची घोषणा करून जनतेला स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात चांगले दिवस लोकांना अनुभवाला आलेच नाहीत. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीतून सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असताना तसेच अन्य देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले असताना देशात मोदी सरकारने हे भाव वाढवत नेण्याचे काम सुरू ठेवले आहे. सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर काही पैशांनी दर कमी करून पुन्हा वाढविण्याची नीती या सरकारने स्वीकारली आहे.

यासुद्धा गोष्टी आता लोकांच्या लक्षात आल्या आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने इंधन व गॅसचे दर कमी करावेत, ते पुन्हा वाढविण्याचा छुपा प्रयत्न करू नये. असा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीतर्फे सरकारविरोधी आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाारा देण्यात आला आहे.आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, विनया पाठक, राहुल पवार, सागर घोडके, नगरसेवक विष्णु माने, योगेंद्र थोरात, दिग्विजय सूर्यवंशी, संगीता हारगे, अतहर नायकवडी, आयुब बारगीर, ज्योती अदाटे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगली