शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सांगली : श्रीमुखात लगाविल्याने बुर्लीत तरुणाचा भोसकून खून, हल्लेखोरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 14:03 IST

किरकोळ वादातून महिन्यापूर्वी श्रीमुखात लगाविलेला राग मनात धरुन बुर्ली (ता. पलूस) येथील गणेश शांताराम शिखरे (वय २२) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर कुणाल चंद्रकांत शिखरे (२०, बुर्ली) यास पलूस पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देश्रीमुखात लगाविल्याने बुर्लीत तरुणाचा भोसकून खूनपलूस पोलिसांनी केली हल्लेखोरास अटक

सांगली : किरकोळ वादातून महिन्यापूर्वी श्रीमुखात लगाविलेला राग मनात धरुन बुर्ली (ता. पलूस) येथील गणेश शांताराम शिखरे (वय २२) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर कुणाल चंद्रकांत शिखरे (२०, बुर्ली) यास पलूस पोलिसांनी अटक केली आहे.मृत गणेश व कुणाल हे दोघेही सेंट्रीग काम करीत होते. महिन्यापूर्वी त्यांच्यात कामावर किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. या वादातून दोघांनी ऐकमेकांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. ते ऐकमेकांशी बोलत नव्हते. गुरुवारी रात्री आठ वाजता गणेश गावातील चौकात मिरवणुक पाहण्यास उभा होता. त्यावेळी कुणाल तिथे गेला. त्याने महिन्यापूर्वी झालेल्या वाद उकरुन काढला.

यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. कुणालने कंबरेला लावलेला चाकू काढून गणेशला भोसकले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडताच कुणाल पसार झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शुक्रवारी सकाळी संशयित कुणाला यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चाकू जप्त केला आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSangliसांगली