Sangli Election : कुपवाडच्या मतदान केंद्रावर दुपारपर्यंत संथगतीने मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:34 IST2018-08-01T16:43:22+5:302018-08-02T17:34:49+5:30
कुपवाड शहर व उपनगरातील प्रभाग 1,2, व 8 मधील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळ व दुपारच्या टप्प्यातील मतदान संथगतीने सुरू होते. त्यामुळे ब-याच मतदान केंद्रावर सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसून येत होते.

Sangli Election : कुपवाडच्या मतदान केंद्रावर दुपारपर्यंत संथगतीने मतदान
कुपवाड : कुपवाड शहर व उपनगरातील प्रभाग 1,2, व 8 मधील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळ व दुपारच्या टप्प्यातील मतदान संथगतीने सुरू होते. त्यामुळे ब-याच मतदान केंद्रावर सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसून येत होते.
कुपवाड शहर परिसर उपनगरात प्रभाग एक,दोन व आठमध्ये एकूण 74 मतदान केंद्रे आहेत.
या मतदान केंद्रामध्ये एकूण 59165 मतदार संख्या आहे. यामध्ये पुरूष 30621 तर महिला 28543 आहेत. या तिन्ही प्रभागातील मतदान केंद्रावर सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान सुरू झाले.हे मतदान सकाळ सत्रापासून संथगतीने सुरू होते. संथगतीने सुरू असलेले मतदान दुपारपर्यंत कायम होते.
दुपारनंतर हळूहळू मतदारांची संख्या वाढत असल्याचे दिसले.दुपारी दिड वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले होते.ब-याच मतदान केंद्रावर महापालिकेने लावलेल्या मालमत्ता व शिक्षणाच्या फलकाची माहिती घेऊन मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर जात होते.
मतदान शांतपणे पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर परिश्रम घेतले होते. कुपवाड पोलिस ठाणे हद्दीतील प्रभाग 1,2,8 मध्ये बदोबस्तासाठी एक डीवायएसपी, तीन पीआय,तीन एपीआय,सहा पीएसआय, एसआरपीएफ प्लाटून व 202 पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तिन्ही प्रभागात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांतपणे मतदान पार पडले.