शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सांगली महापालिकेकडून २०० व्यापाऱ्यांना घरपट्टी वाढीच्या नोटीस, व्यापारी संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:17 IST

पाणी कनेक्शन बंद तरीही पाणीपट्टी

सांगली : येथील वसंतदादा पाटील मार्केट यार्डातील जवळपास २०० व्यापाऱ्यांना घरपट्टी वाढीच्या नोटीस महापालिका प्रशासनाने बजावल्या आहेत. महापालिका 'ड' दर्जाची असून 'अ' दर्जाची घरपट्टी वाढवल्याचा दावा व्यापा-यांनी केला आहे. सद्या १७ हजार रुपये घरपट्टी येणाऱ्या व्यापाऱ्यांना साडेचार लाखापर्यंत घरपट्टी वाढविली आहे. घरपट्टीत अव्वाच्या सव्वा वाढ झाल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी महापालिकेला तुमची घरपट्टी वाढ आम्हाला मान्य नसल्याचा लेखी खुलासा व्यापाऱ्यांनी केला आहे.सांगली मार्केट यार्डात राज्यभरातून शेतीमाल विक्रीसाठी येत आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून दरवर्षी घरपट्टीची ७० ते ८० लाख रुपये महापालिकेकडे भरले जात आहेत. पण, महापालिका प्रशासनाकडून रस्ते, गटारी, पाणी आणि विजेची काहीच सुविधा मिळत नाहीत. रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. लाखो रुपये खर्च करून दीड वर्षापूर्वी मुख्य चौकात स्ट्रीट लाईट बसविली आहे. पण, एकच महिना ती चालू होती. आजअखेर स्ट्रीटलाईट बंदच आहे.अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून पुन्हा वाढीव घरपट्टीच्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. घरपट्टी वाढ ४० ते ५० पटीने वाढ केल्याचा दावा करीत महापालिका प्रशासनाच्या या धोरणाविषयी व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली.

पाणी कनेक्शन बंद तरीही पाणीपट्टीसांगली मार्केट यार्डातील दैनंदिन व्यवहार सकाळी १० वाजल्यापासून सुरू होतात. परंतु, या भागात पाणीपुरवठा विभागामार्फत सकाळी सात ते आठ या वेळेत पाणीपुरवठा होतो. याबाबत महापालिकेशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. मार्केट यार्डातील पाण्याचे कनेक्शन बंद करूनही अद्याप पाण्याची बिले दिली जातात. ही बाब अयोग्य असून याची आकारणी करण्यात येऊ नये. तसेच बंद झालेले पाणी कनेक्शन रद्द करावीत, अशी मागणी व्यापा-यांनी केली आहे.

साफसफाई बंद, घंटागाडी फिरकतच नाहीसांगली मार्केट यार्डातील रस्ते खड्डेमय झाले असून, अपुरी लाईट व्यवस्थेमुळे शेतीमालाच्या चोऱ्यात वाढ झाली आहे. संपूर्ण ड्रेनेज व्यवस्था खराब झाली असून, पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून राहते. साफसफाई कधीही केली जात नसून घंटागाडीची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील व्यापाऱ्यांना कर आकारणी संदर्भात नोटीस आल्या आहेत. आमचे सभासदांना आलेल्या नोटीस मान्य व कबूल नाहीत. सांगली मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षणासाठी शासनाचे मान्यतेवरून शेड बांधलेले आहेत. त्या जागेत कोणताही खरेदी-विक्री व्यवहार होत नाही. परंतु, यास व्यावसायिक दराने घरपट्टी आकारणी करणे अयोग्य आहे. वाढीव घरपट्टी आम्ही भरणार नाही. - अमरसिंह देसाई, अध्यक्ष, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स.

टॅग्स :Sangliसांगली