शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेने ५१ हजारांवर रुग्णांचे वाचविले ३.८१ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 17:20 IST

निदान केंद्राचा दिलासा : प्रशासनाकडून तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सांगली : तिसरा वर्धापन दिन साजरा करीत असलेल्या सांगली महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रामुळे ५१ हजार ३४३ रुग्णांचे तब्बल ३ कोटी ८१ लाख ९७ हजार रुपये वाचले.सांगली महापालिकेच्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निदान केंद्राचा तृतीय वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निदान केंद्राचे कामकाज सुरू आहे.महापालिका कार्यक्षेत्रामधील सामान्य गरजू, गोरगरीब नागरिकांना विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, ईसीजी तसेच एक्स-रे या सेवांचा मोफत व अल्प दरांमध्ये लाभ घेता यावा, या हेतूने हे केंद्र सुरू झाले. पडीक असलेल्या एका इमारतीचा पुनर्वापर करून या केंद्राद्वारे निव्वळ नागरिकांना उत्तम प्रकारे सेवा देण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवण्यात आले.

केंद्र व महालॅबतर्फे ८५ मोफत चाचण्यासध्या मध्यवर्ती निदान केंद्र व महालॅब, असे संयुक्तरीत्या कार्यरत आहेत. मध्यवर्ती निदान केंद्राकडून १५ स्पॉट, ईसीजी व एक्स-रे मिळून एकूण ४८ प्रकारच्या व महालॅबकडून ३७ प्रकारच्या मोफत तपासण्या केल्या जातात. त्यामुळे दिवसेंदिवस निदान केंद्रामध्ये रुग्णांच्या होणाऱ्या तपासण्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

महापालिकेला ४१ लाखांचे उत्पन्नकेंद्र सुरू झाल्यापासून ९ ऑक्टोबर २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ३ कोटी ८१ लाख ९७ हजार ८६५ रुपयांची नागरिकांची बचत झाली आहे. महापालिकेस ४१ लाख ८१ हजार १७४ रुपयांचे उत्पन्नही मिळाले. केंद्राकडून आजअखेर ५१ हजार ३४३ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. एकूण १ लाख ४८ हजार ४१८ तपासण्या पार पडल्या.

नागरिकांनी लाभ घ्यावा : शुभम गुप्तासध्या मध्यवर्ती निदान केंद्रामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, चांगल्या दर्जाची सेवा देण्यात येत आहे. या केंद्राकरिता तीन लॅब टेस्टिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल