शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

सांगली महापालिकेत महापौरपदी खोत की मदने?, भाजपकडून अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 8:09 PM

सांगली महापालिकेत सत्ता परिवर्तन केल्यानंतर भाजपच्या पहिल्या महापौरपदासाठी संगीता खोत व सविता मदने तर उपमहापौर पदासाठी धीरज सुर्यवंशी व पांडूरंग कोरे यांचे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले.

ठळक मुद्देसांगली महापालिकेत महापौरपदी खोत की मदने?भाजपकडून अर्ज दाखल : उपमहापौरपदासाठी धीरज सुर्यवंशी, कोरे यांचे अर्ज

सांगली : महापालिकेत सत्ता परिवर्तन केल्यानंतर भाजपच्या पहिल्या महापौरपदासाठी संगीता खोत व सविता मदने तर उपमहापौर पदासाठी धीरज सुर्यवंशी व पांडूरंग कोरे यांचे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले.

काँग्रेस आघाडीकडून महापौरपदासाठी वर्षा अमर निंबाळकर, तर उपमहापौरपदासाठी स्वाती पारधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवार २० रोजी महापौर व उपमहापौरपदाचा फैसला होणार आहे.महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी २० आॅगष्ट रोजी निवडणूक होत आहे. गेल्या दोन दिवसापासून महापौर, उपमहापौर निवडीबाबत भाजपात गुप्त खलबते सुरु होती. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भाजपच्या सर्व सदस्यांशी चर्चा केली. त्यांची मते आजमावून घेतली.

गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, दीपकबाबा शिंदे आदींची बैठक झाली.महापौरपदासाठी संगीता खोत,अनारकली कुरणे, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, कल्पना कोळेकर आदी इच्छूक होते. यापैकी सविता मदने, संगीता खोत, कल्पना कोळेकर, अनारकली कुरणे यांची नावे प्रदेशकडे पाठवली होती.अखेर दुपारी एकच्या सुमारास संगीता खोत व सविता माने यांचे महापौरपदासाठी तर धीरज सुर्यवंशी, पांडूरंग कोरे यांचे उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याचा निर्णय भाजपने घेतला. दुपारी दीडच्या सुमारास आमदार सुधीर गाडगीळ,आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत खोत, मदने, सुर्यवंशी, कोरे यांनी उपायुक्त सुनिल पवार, नगरसचिव के. सी. हळीगंळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.काँग्रेस-राष्ट्रवादीनेही महापौरपदाची निवडणुक लढविण्याची घोषणा केली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे नेते कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील यांनी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांशी चर्चा केली.

त्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून महापौर पदासाठी काँग्रेसच्या वर्षा अमर निंबाळकर, तर उपमहापौरपदासाठी स्वाती सुरेश पारधी यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार या दोन्ही नगरसेविकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावेळी माजी महापौर हारुण शिकलगार, माजी गटनेते किशोर जामदार, कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील, प्रा.पद्माकर जगदाळे, मैनुद्दीन बागवान, विष्णू माने ,संतोष पाटील आदी उपस्थित होते.महापौरपदी खोत की मदने?आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, सांगली महापालिकेत भाजपाचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर,उपमहापौरपदासाठी सर्व सदस्यांची मते विचारात घेऊन नेत्यांनी संमतीने महापौरपदासाठी संगीता खोत, सविता मदने यांचे तर उपमहापौर पदासाठी धीरज सुर्यवंशी, पांडूरंग कोरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाचेच महापौर, उपमहापौर विजयी होणार हे निश्चित आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूक