शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 13:49 IST

संकेतला महापालिका मदत करणार का? अशा आशय वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयुक्तांनी मदतीची घोषणा केली.

सांगली : राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगर याला महापालिकेकड़ून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी केली. तसेच त्याची बहीण काजल हिला एक लाखाचे  बक्षीस जाहीर केले.येथील अहिल्याबाई होळकर चौकात राहणाऱ्या संकेत  याने वयाच्या तेराव्या वर्षापासून वेटलिफ्टिंगचा सराव सुरू केला होता. त्याच्या वडिलांचा पानटपरी व भजी, चहाविक्रीचा व्यवसाय आहे. अशा बिकट परिस्थितीत संकेतने वेटलिफ्टिंगचे धडे गिरवले. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळवीत देशासाठी पदकाचे खातेही उघडले. त्याच्या या कामगिरीने सांगलीचे नाव देशातच नव्हे, तर जगात पोहोचले. शहरातील खेळाडूने इतिहास घडविल्याने त्याला महापालिकेकडूनही मदत देण्याची मागणी क्रीडाप्रेमींतून होत होती.आयुक्त कापडणीस यांनी मंगळवारी सरगर यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन संकेतच्या यशाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी संकेतशीही व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. संकेत सरगर याला पाच लाख, तर खेलो इंडियामध्ये सुवर्णपदक विजेत्या बहीण काजलला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले. या दोन्ही खेळाडूंना महापालिका दत्तक घेणार असून, त्यांना प्रतिमहा दहा हजारांची शिष्यवृत्तीही देण्यात येईल.संजयनगर परिसरात अद्ययावत जीम व प्रशिक्षक महापालिका उपलब्ध करून देणार असल्याचेही कापडणीस यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक मनगू सरगर, संतोष पाटील, मनोज सरगर, संजय कांबळे, सहायक आयुक्त नितीन शिंदे, वैभव वाघमारे, नकुल जकाते उपस्थित होते. दरम्यान, नगरसेवक विष्णू माने, भाजपचे सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, सरचिटणीस दीपक माने यांनीही आयुक्तांकडे मदतीची मागणी केली होती.‘लोकमत’चा पाठपुरावासंकेत याने सांगलीचा झेंडा जगात रोवला आहे. त्याला राज्य शासन, आमदार विश्वजित कदम व जिल्हा परिषदेकडून मदतीचा हात देण्यात आला. संकेतला महापालिका मदत करणार का? अशा आशय वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयुक्तांनी मदतीची घोषणा केली. ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश आले.महापालिकेच्या सेवेत घ्या : सरगरराज्य शासनाच्या निर्णयानुसार अत्युच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी ५ टक्के राखीव कोटा निश्चित करून दत्तक योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संकेत याला महापालिकेच्या सेवेत कायम सामावून घ्यावे, अशी मागणी नगरसेवक मनोज सरगर यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली.

टॅग्स :SangliसांगलीCommonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा