शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : इस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळ, विधानसभा मतदारसंघातील हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:57 IST

इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे.

ठळक मुद्देइस्लामपूरमध्ये राजकीय समीकरणांचा गोंधळविधानसभा मतदारसंघातील हालचालीभाजपची उसनवारीच्या तव्यावर पोळी

अशोक पाटील

इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मंत्री खोत यांनी राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील, वैभव शिंदे यांना भाजपमध्ये आणून आपली पोळी भाजून घेतली आहे. तर खा. शेट्टी यांनी अलीकडील काही दिवसांत राष्ट्रवादीशी सलगी केली आहे. यामुळे सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील उसाला दर देण्यासाठी शेट्टी व खोत यांनी साखर सम्राटांविरोधात आवाज उठविला होता. साखर सम्राटांचे नेतृत्व करणारे तत्कालीन मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात शेट्टी आणि खोत यांनी रान पेटविले होते. लोकसभा निवडणुकीत दोघेही महाआघाडीच्या माध्यमातून भाजपच्या वळचणीला जाऊन बसले.

भाजपला चांगले यशही मिळाले आणि सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यासमोर मंत्रीपद दिसू लागले. ते मिळविण्यासाठी प्रसंगी खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल दिली. त्यासाठी फडणवीस यांच्याकडे वाऱ्याही वाढविल्या. अखेर त्यांना कृषी राज्यमंत्री पद मिळाले.मंत्रिपदामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे वाटत असतानाच खोत यांनी भाजपची पाठराखण करीत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच रेंगाळत ठेवले. तसेच पुलतांबा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही त्यांनी कसलीही मध्यस्थी केली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष बळावला. तेव्हापासून शेट्टी आणि खोत यांच्यातील दरी रुंदावत गेली.इस्लामपूर मतदारसंघावर एकमुखी नेतृत्व असलेल्या जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीतीलच दोन प्यादी फोडून खोत यांनी स्वत:ची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष (पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे) निशिकांत पाटील आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.

इस्लामपूर मतदारसंघात पाचवेळा मुख्यमंत्र्यांनी येऊन शेतकऱ्यांच्या चळवळीबरोबर राष्ट्रवादीलाही खिंडार पाडण्याचेच काम केले आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर गटांतील कार्यकर्त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत इस्लामपूर मतदारसंघात राजकीय समीकरणे रोजच बदलत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीElectionनिवडणूक