शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

सांगली : लिंगायत समाजातर्फे मंत्रालयावर मोटारसायकलने मोर्चा, पाच हजार दुचाकीस्वारांचा सहभाग अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 15:28 IST

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा, यासाठीचा लढा आणखी तीव्र केला जाणार आहे. लिंगायत समाजाच्या मोर्चानंतर आता मार्च महिन्यात होणाऱ्यां विधिमंडळ अधिवेशनावेळी मंत्रालयावर मोटारसायकल रॅलीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लिंगायत समाज महामोर्चा समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ मिरजकर व प्रदीप वाले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

ठळक मुद्देपाच हजार दुचाकीस्वारांचा सहभाग अपेक्षित : विश्वनाथ मिरजकर, प्रदीप वाले महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून २५०० किलोमीटरचा प्रवास लिंगायत समाज महामोर्चा समन्वय समितीचे अध्यक्ष मिरजकरलिंगायत समाजाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय

सांगली : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा, यासाठीचा लढा आणखी तीव्र केला जाणार आहे. लिंगायत समाजाच्या मोर्चानंतर आता मार्च महिन्यात होणाऱ्यां विधिमंडळ अधिवेशनावेळी मंत्रालयावर मोटारसायकल रॅलीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लिंगायत समाज महामोर्चा समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ मिरजकर व प्रदीप वाले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.ते म्हणाले की, सांगलीत लिंगायत समाजाने विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबर रोजी मोर्चा काढला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या लढ्याची पुढची दिशा ठरविण्यासाठी समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळावर मोटारसायकल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटकातील सरकारने लिंगायत समाजाला धर्ममान्यता व अल्पसंख्याक दर्जा देण्याचा ठराव करून केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही केंद्राकडे शिफारस करावी, यासाठी या मोर्चाचे नियोजन केले जात आहे.

अधिवेशनापूर्वी दहा दिवस आधी सांगलीतून मोर्चाला सुरुवात होईल. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून २५०० किलोमीटरचा प्रवास करून अधिवेशनापूर्वी हा मोर्चा मुंबईत मंत्रालयावर येऊन धडकेल. त्यात पाच हजार मोटारसायकलस्वार सहभागी होतील. तसेच लिंगायत समाजाचे धर्मगुरूंचाही सक्रिय सहभाग असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संजीव पट्टणशेट्टी, डी. के. चौगुले उपस्थित होते.

असा असेल मार्गसांगली, कवठेमहांकाळ, जत, विजापूर, कुडलसंगम, कलबुर्गी, बसवकल्याण, उदगीर, नांदेड, अहमदपूर, लातूर, तुळजापूर, सोलापूर, बार्शी, कपिलधारा, बीड, अहमदनगर, पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे व मंत्रालय.

सांगलीत सभागृहलिंगायत समाजाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लहान-मोठ्या कार्यक्रमांसाठी सभागृहही बांधण्यात येणार आहे. यात समाजाचे कार्यालय, दीडशे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र, तसेच लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीrelationshipरिलेशनशिप