शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

सांगली-मिरजेत घुमला विठुनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:46 IST

शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरात कीर्तनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.गणेश मंगल कार्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ‘पांडुरंगी मन रंगले’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.

ठळक मुद्देआषाढी एकादशीनिमित्त मंदिरांमध्ये गर्दीपालखी, दिंडी, कीर्तनासह धार्मिक कार्यक्रम उत्साहात

सांगली : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या सांगलीकरांनी शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती. शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरात कीर्तनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

स्टेशन रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात शैलेश शितोळे व जया शितोळे यांच्याहस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, खजिनदार आर. डी. पवार, श्रीकांत चोपडे, दिलीप सूर्यवंशी, भास्कर वाघ पुजारी, सागर घोडके, उमेश वार्इंगडे, दत्तात्रय चोपडे, नारायण गायकवाड आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी सागर घोडके यांच्यावतीने भाविकांना लाडू, केळी, खजुराचे वाटप करण्यात आले.

मारुती रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात देखील भाविकांची लगबग होती. कर्नाळ रस्त्यावरील नामदेव मंदिरात यंदा विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेविका स्वाती शिंदे आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. पहाटे महापूजेनंतर दिवसभरात महिला मंडळातर्फे हरिपाठ वाचन, जप, तसेच सायंकाळी बाळकृष्ण मुळे यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच येथील गणेश मंगल कार्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ‘पांडुरंगी मन रंगले’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.

यासह शहरातील उपनगरांतील मंदिरांमध्येही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांच्या गर्दीने मंदिरे फुलून गेली होती.उपवासाच्या : पदार्थांना मागणीआषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरात उपवासाच्या पदार्थांची चांगली विक्री झाली. यंदा सर्वच पदार्थांच्या किमती वाढल्या होत्या. त्यात खजूर, रताळांची चांगली विक्री झाली. फळांनाही मागणी होती. ओल्या शेंगा, रताळी, बटाट्यांना मागणी होती. तसेच उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या वाघाट्यांनाही बाजारात मागणी होती.

 

टॅग्स :SangliसांगलीTempleमंदिर